प्रणव मुखर्जींविरुद्ध आता काँग्रेसमध्ये आवाज चढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 05:00 AM2018-05-31T05:00:43+5:302018-05-31T05:00:43+5:30
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सात जून रोजी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर अनेक तास गप्प बसल्यानंतर बुधवारी काँग्रेसने निषेधाचा सूर आळवला आहे.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सात जून रोजी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर अनेक तास गप्प बसल्यानंतर बुधवारी काँग्रेसने निषेधाचा सूर आळवला आहे.
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही मुखर्जी यांनी मी त्यांच्या जागी असतो तर संघाचे हे निमंत्रण स्वीकारले नसते, असे म्हटले. चिदंबरम यांनी मुखर्जी यांना त्यांनी संघाला त्याने आपला दृष्टिकोन व विचारधारा चूक असल्याचे सांगावे असा सल्ला द्यावा असे म्हटले. माजी रेल्वेमंत्री सी. के. जाफर शरीफ यांनी मुखर्जी यांच्या निर्णयावर जोरदार टीका करून त्यांचा निर्णय काँग्रेसच्या विचारधारेविरुद्ध असल्याचे म्हटले.
केरळमधील माजी खासदार रमेश चेन्निथला म्हणाले की, मी मुखर्जी यांनाच पत्र लिहून या निर्णयाचा फेरविचार करावा व संघाच्या कार्यक्रमाला जाऊ नये, असे म्हटले. चेन्निथला यांनी पत्रात स्पष्ट लिहिले आहे की, तुम्ही ज्या समारंभाला जात आहात ती धार्मिक संघटना आहे.