तुफान राडा! एका नवऱ्यासाठी 2 बायका रस्त्यातच भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 14:46 IST2022-10-24T14:35:37+5:302022-10-24T14:46:54+5:30
नवऱ्याला पाहण्यासाठी आलेल्या दोन पत्नींमध्ये भांडण झालं. प्रकरण वाढत असल्याचे पाहून पतीही तेथे पोहोचला आणि शेवटी दोन्ही पत्नींना त्याने चपलेने चोप दिला.

तुफान राडा! एका नवऱ्यासाठी 2 बायका रस्त्यातच भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...
उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यातील लोहिया जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन महिलांनी एकमेकींना बेदम मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. कोणाला काही समजण्याआधीच दोघीही एकमेकींवर तुटून पडल्या. तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने दोन्ही महिलांना चप्पलेने मारहाण केली. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील हे विचित्र प्रकरण पाहून सर्वच जण हैराण झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नवऱ्याला पाहण्यासाठी आलेल्या दोन पत्नींमध्ये भांडण झालं. प्रकरण वाढत असल्याचे पाहून पतीही तेथे पोहोचला आणि शेवटी दोन्ही पत्नींना त्याने चपलेने चोप दिला. महिलांच्या या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मोहल्ला मऊ दरवाजा येथील रहिवासी देवेंद्र कुमार यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना किरण आणि पुष्पा अशा दोन पत्नी आहेत.
देवेंद्रला पाहण्यासाठी दोन्ही पत्नी गुरुवारी एकत्र लोहिया रुग्णालयात पोहोचल्या. आपत्कालीन कक्षासमोर किरण आणि पुष्पा यांच्यात बाचाबाची झाली. त्यावरुन दोघींमध्ये वाद झाला. हे प्रकरण वाढल्यावर दोघींमध्ये जोरदार हाणामारी झाली. हा प्रकार कळताच देवेंद्रही रुग्णालयातून बाहेर आला. दोघींच्या भांडणाचा तमाशा पाहत तो काही वेळ उभा राहिला.
पतीने दोघींनाही समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणी ऐकेना मग देवेंद्रने दोन्ही पत्नींना चप्पलने मारहाण केली. यानंतर दोघीही एकमेकींना धमक्या देत निघून गेल्या. देवेंद्रही पुष्पासोबत घरी गेला. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"