तेलगू देसमच्या यादीमध्ये इव्हीएम चोराचे नाव नव्हते
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 04:14 AM2019-04-15T04:14:36+5:302019-04-15T04:15:04+5:30
ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळाच्या यादीमध्ये ईव्हीएम चोराचे नाव नव्हते, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळाच्या यादीमध्ये ईव्हीएम चोराचे नाव नव्हते, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे. तेलगू देसमने अन्य कोणी तज्ज्ञ असल्यास आयोगाला कळवावे. आम्ही त्याच्याबरोबर चर्चा करण्यास तयार असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.
तेलगू देसमचे शिष्टमंडळ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाकडे ईव्हीएमबाबत चर्चा करण्यास गेले होते. त्यांच्यासोबत हरि प्रसाद नावाचा एक तांत्रिक सल्लागार होता. त्याला सन २०१०मध्ये ईव्हीएम चोरी प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली होती. ही माहिती कळताच आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याशी चर्चा करण्यास नकार दिला होता.