ट्रेनमध्ये कोणीच नव्हता, राजधानी वाटली! ओडिशासारखा अपघात आसाममध्ये टळला, काय घडले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 08:50 AM2023-06-04T08:50:49+5:302023-06-04T08:53:43+5:30
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे.
आसामच्या कोक्राझार जिल्ह्यात शनिवारी ओडिशासारखा रेल्वे अपघात टळला आहे. एका ट्रेनचे इंडिन अचानक ट्रेनपासून दोन डबे घेऊन वेगळे झाले आणि पुढे निघून गेले. मागाहून ट्रेन येत नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. ट्रेनचे उरलेले ८ डबे मागेच राहिले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कोक्राझार आणि फकिराग्राम रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. रेल्वेचे इंजिन दोन बोगी घेऊन पुढे गेले तर आठ डबे मागे राहिले. चालक दलाच्या लक्षात येईस्तोवर हे इंजिन ६०० मीटर पुढे निघून गेले होते. या ट्रेनमध्ये एकही प्रवासी नव्हता.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, "आम्ही इंजिनला बोगीपासून वेगळे होताना पाहिले. ट्रेनचे इंजिन काही डबे सोडून सुमारे 600 मीटर धावत राहिले. सुदैवाने ट्रेनमध्ये प्रवासी नव्हते. आम्हाला सुरुवातीला ती राजधानी एक्सप्रेस वाटली परंतू तरी ती नवीन ट्रेन आहे हे समजले. आम्हाला तिचे नाव माहित नव्हते. नंतर लोको पायलटला ही बाब कळताच त्याने इंजिन परत आणले आणि रेल्वे स्थानकाच्या गार्डच्या मदतीने बोगी जोडण्यात आली.''
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 900 लोक जखमी झाले आहेत.
ओडिशामध्ये रेल्वे ट्रॅक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर...
#WATCH | Restoration work underway at the site of #BalasoreTrainAccident in Odisha
— ANI (@ANI) June 4, 2023
As per the Railway Ministry, 1000+ manpower engaged in the work. More than 7 Poclain Machines, 2 Accident Relief Trains, 3-4 Railway and Road Cranes deployed pic.twitter.com/nboIkqqkjK