आली UNच्या मुख्यालयी ही दिवाळी

By admin | Published: October 30, 2016 10:30 AM2016-10-30T10:30:03+5:302016-10-30T10:30:03+5:30

प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीला भारताता उत्साहात सुरुवात झाली असताना मॅनहॅटन स्थित संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालयही शनिवारी दिव्यांनी उजळले.

There was a UN headquarter this Diwali | आली UNच्या मुख्यालयी ही दिवाळी

आली UNच्या मुख्यालयी ही दिवाळी

Next
ऑनलाइन लोकमत
संयुक्त राष्ट्रे, दि. 30 -  प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीला भारताता उत्साहात सुरुवात झाली असताना मॅनहॅटन स्थित संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालयही शनिवारी दिव्यांनी उजळले. संयुक्त राष्ट्रांमध्ये पहिल्यांदाच दिवाळसण साजरा करण्यात आला. दरम्यान, दिवाळी साजरी केल्याबद्दल भारताने संयुक्त राष्ट्रांचे आभार मानले. 
शनिवारी दिवाळीनिमित्त जगातील प्रमुख संघटना असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या (यूनो) मुख्यालयावर निळ्या रंगाची रोषणाई करण्यात आली. तसेच "HAPPY DIWALI" असा संदेशही संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयावर करण्यात आलेल्या रोषणाईतून देण्यात आला. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे दूत आणि स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ट्विटरवरून संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाचे छायाचित्र शेअर केले आणि दिवाळ सण साजरा करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांचे आभार व्यक्त केले.

Web Title: There was a UN headquarter this Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.