उत्तराखंडमधील नऊ बंडखोरांबद्दल अनिश्चितता वाढली
By admin | Published: May 8, 2016 01:34 AM2016-05-08T01:34:34+5:302016-05-08T01:34:34+5:30
उत्तराखंडमध्ये अपात्र घोषित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या नऊ आमदारांच्या भवितव्याबाबतची अनिश्चितता आणखी वाढली आहे. कारण उत्तराखंड उच्च न्यायालयाने या मुद्द्यावरील
नैनिताल : उत्तराखंडमध्ये अपात्र घोषित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या नऊ आमदारांच्या भवितव्याबाबतची अनिश्चितता आणखी वाढली आहे. कारण उत्तराखंड उच्च न्यायालयाने या मुद्द्यावरील आपला निर्णय सोमवारपर्यंत राखून ठेवला आहे. तर मंगळवारी राज्याचे बडतर्फ मुख्यमंत्री हरीश रावत हे विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत.
सुमारे तीन तास दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती यू.सी. ध्यानी यांनी सोमवारी सकाळी १०.१५ वाजता निर्णय देण्यात येईल, असे सांगितले. सभागृहात शक्तिपरीक्षेचा आदेश देताना अपात्र घोषित करण्यात आलेल्या आमदारांची अपात्रता कायम राहिल्यास ते विश्वासदर्शक ठरावावरील मतदानात सहभागी होऊ शकणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. सोबतच विद्यमान प्रकरणातील आमच्या या निरीक्षणामुळे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणात कुठलाही पूर्वग्रह राहणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले होते.
काँग्रेसच्या आमदारांनी भाजपा आमदारांसोबत राज्यपालांना एक संयुक्तपणे निवेदन देऊन विनियोग विधेयकावर मतविभाजनाची मागणी करण्यात काय गैर होते, असा अॅड. सुंदरम यांचा सवाल होता. (वृत्तसंस्था)