पाकमध्येही भारतीय चित्रपट बघायला मिळणार
By admin | Published: October 26, 2016 01:14 AM2016-10-26T01:14:31+5:302016-10-26T01:14:31+5:30
भारतीय चित्रपटांना पाकिस्तानात करण्यात आलेली बंदी मागे घेण्याचा विचार थिएटर मालक संघटना करत आहे. अर्थात या माध्यमातून ते स्वत:ची आर्थिक ‘मुश्किल’ दूर
नवी दिल्ली : भारतीय चित्रपटांना पाकिस्तानात करण्यात आलेली बंदी मागे घेण्याचा विचार थिएटर मालक संघटना करत आहे. अर्थात या माध्यमातून ते स्वत:ची आर्थिक ‘मुश्किल’ दूर करणार आहेत. तथापि, ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनावरुन झालेल्या वादानंतर मनसेच्या भूमिकेवर सैन्याने घेतलेल्या निर्णयावरुनही पाकिस्तानात आनंद व्यक्त केला जात आहे.
द एक्सप्रेस ट्रिब्यूनने याबाबत वृत्त दिले आहे.पाकिस्तानातील एका अग्रगण्य वितरण कंपनीच्या मालकांनी या वृत्तपत्राला सांगितले की, पाकिस्तानमधील चित्रपटगृहांना आर्थिक उत्पन्नासाठी भारतीय चित्रपटांवर मोठा विश्वास आहे. त्यामुळेच भारतीय चित्रपटांवरील बंदी उठविण्याची घोषणा आगामी काळात होऊ शकते.
बॉलीवूडची चलती
पाकिस्तानात बॉलीवूड चित्रपटांची मोठी चलती आहे. याच चित्रपटांच्या भरवशावर येथील थिएटरला मोठा महसूल मिळतो. भारतीय चित्रपटांवर बंदी आणल्याने साहजिकच याचा फटका चित्रपटगृह मालकांना बसत आहे. त्यामुळेच आर्थिक ‘मुश्किल’दूर करण्यास पाकिस्तानात प्रयत्न
सुरु झाले आहेत.