'मोदी तोडणार काँग्रेसचा रेकॉर्ड, 2047पर्यंत राहणार देशात भाजपाची सत्ता'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 09:42 AM2019-06-08T09:42:43+5:302019-06-08T10:13:31+5:30
लोकसभा निवडणूक 2019मध्ये भाजपानं देदीप्यमान विजय मिळवला आहे.
आगरताळाः लोकसभा निवडणूक 2019मध्ये भाजपानं देदीप्यमान विजय मिळवला आहे. या विजयामुळेच पक्षाच्या नेत्यांचाही आत्मविश्वास दुणावला आहे. भाजपाचे महासचिव राम माधव यांनी शुक्रवारी पार्टीच्या एका कार्यक्रमात मोठा दावा केला आहे. भाजपा 2047पर्यंत देशातली सत्ता काबीज करेल. तसेच सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसचा रेकॉर्ड भाजपा तोडेल, असंही ते म्हणाले आहेत.
भाजपाचे महासचिव राम माधव शुक्रवारी त्रिपुरामध्ये म्हणाले, जर कोणता पक्ष सर्वाधिक काळ सत्तेत राहिला असेल तर तो काँग्रेस आहे. काँग्रेसनं 1950 ते 1977पर्यंत देशात सत्ता गाजवली. मी तुम्हाला विश्वासानं सांगू शकतो की, मोदी हा रेकॉर्ड तोडतील. 2047ला स्वातंत्र्याचं 100वे वर्षं भारत साजरा करेल, तोपर्यंत देशात भाजपाची सत्ता राहील, असंही राम माधव म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीत आगरताळा, त्रिपुरातल्या दोन्ही जागा भाजपानं जिंकल्यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवला होता.
Ram Madhav, BJP in Tripura: If there's any party which has been in power for longest duration, it's Congress - from 1950 to 1977. I assure you that Modi ji is going to break that record...There will be BJP in power till the time we enter 100th yr of independence in 2047. (07.06) pic.twitter.com/deWi8s8FjB
— ANI (@ANI) June 8, 2019
या कार्यक्रमात त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव, राष्ट्रीय महासचिव राम माधवसह इतर नेतेही सहभागी होते. यावेळी भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजय राहटकर म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीतला हा विजय म्हणजे पूर्णविराम नाही. ही तर सुरुवात आहे, अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे.