मुंडगाव येथे मंडळस्तरीय सचिवालय असावे
By admin | Published: December 20, 2014 10:28 PM2014-12-20T22:28:21+5:302014-12-20T22:28:21+5:30
लोहारी (मंुडगाव) : आकोट तालुक्यातील मुंडगाव मंडळाची स्थापना २००८-०९ मध्ये झालेली आहे. या मंडळांतर्गत १८ हजार ७७८ एवढी लोकसंख्या असून, या मंडळाला व मुंडगाव येथे नवीन ग्रामसचिवालयाला मंजुरात देऊन बांधकाम करण्याची मागणी जनतेने केली आहे.
Next
ल हारी (मंुडगाव) : आकोट तालुक्यातील मुंडगाव मंडळाची स्थापना २००८-०९ मध्ये झालेली आहे. या मंडळांतर्गत १८ हजार ७७८ एवढी लोकसंख्या असून, या मंडळाला व मुंडगाव येथे नवीन ग्रामसचिवालयाला मंजुरात देऊन बांधकाम करण्याची मागणी जनतेने केली आहे.आकोट तालुक्यातील मुंडगाव सर्कल सुरुवातीला उमरा मंडळामध्ये होते व त्यानंतर आकोट मंडळामध्ये देण्यात आले होते; परंतु लोकांच्या होणार्या पायपिटीचा विचार करून मुंडगाव मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळामध्ये एकूण खातेदार ४ हजार ८४० असून, १८ हजार ७७८ एवढी लोकसंख्या आहे. या मंडळामध्ये मुंडगाव, सुलतानपूर, नयनापूर, अल्यारपूर, लामकाणी, फत्तेपूर, शहापूर, वारूळा, बळेगाव, आलेगाव, देवरी, पिंप्री, आलेवाडी, रौंदळा, हिलालाबाद, पाटसूल, पळसोद अशा १७ गावांचा समावेश आहे. या मंडळामध्ये एकूण ६ सांझाचा कारभार चालतो. मुंडगावमध्ये जर नवीन सचिवालयाच्या इमारतीला शासनाने मान्यता दिली तर त्यातील १८ हजार ७७८ लोकांना ते सोयीचे होणार आहे. साधे रहिवासी प्रमाणपत्र असेल किंवा भूमिहीन असल्याचे प्रमाणपत्र पाहिजे असेल तर शहरात असलेल्या तलाठी, ग्रामसेवकाच्या भेटीसाठी प्रवास करावा लागत आहे. ते न भेटल्यास दलालाकडून होणारी आर्थिक लूटसुद्धा सहन करावी लागते. हे टाळण्यासाठी मुंडगाव मंडळांतर्गत मुंडगाव येथे ग्रामसचिवालयाची इमारत बांधकामाकरिता मंजुरात द्यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत. (वार्ताहर).......