जम्मू-काश्मिरातील निवडणुकीच्या तारखेबाबत आणखी चर्चा होणार

By admin | Published: October 19, 2014 02:41 AM2014-10-19T02:41:03+5:302014-10-19T02:41:03+5:30

जम्मू काश्मिरात विविध राजकीय पक्षांचे मत जाणून घेतल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांबाबत दिल्लीत आणखी चर्चा केली जाईल,

There will be further discussions regarding the dates of elections in Jammu and Kashmir | जम्मू-काश्मिरातील निवडणुकीच्या तारखेबाबत आणखी चर्चा होणार

जम्मू-काश्मिरातील निवडणुकीच्या तारखेबाबत आणखी चर्चा होणार

Next
श्रीनगर : जम्मू काश्मिरात विविध राजकीय पक्षांचे मत जाणून घेतल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांबाबत दिल्लीत आणखी चर्चा केली जाईल,                   असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आह़े
राज्यात निवडणुका नियोजित कार्यक्रमानुसार झाल्यास, पूरप्रभावित भागांतील मदत आणि पुनर्वसन कार्यात कुठलीही बाधा येणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केल़े मुख्य निवडणूक आयुक्त व्ही़एस़ संपत यांनी आज शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, निवडणुका वेळेवर पार पडल्यास आयोगाच्या कुठल्याही दिशानिर्देशांमुळे पूरग्रस्त भागांतील पुनर्वसन कार्य प्रभावित होणार नाही, असे आमचे प्रयत्न असतील़ मदत कार्यात आम्ही कुठलाही हस्तक्षेप करणार नाही़ तत्पूर्वी आज जम्मू काश्मिरातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा ठरविण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने राज्यातील राजकीय पक्षांचे मत जाणून घेतल़े  यावेळी नॅशनल कॉन्फरन्सने गत महिन्यातील महापूर आणि त्यामुळे झालेल्या विध्वंसाच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक आणखी काही काळ पुढे ढकलण्याचा सल्ला दिला़ याउलट सत्तारूढ आघाडीत सामील काँग्रेस आणि पीडीपी तसेच अन्य विरोधी पक्षांनी यावर्षीच्या अखेरीस नियोजित कार्यक्रमानुसार निवडणुका घेण्याचा सल्ला दिला़  (वृत्तसंस्था)
 
4काश्मीर खो:यातील 46 विधानसभा मतदारसंघांपैकी किमान 25 मतदारसंघांना महापुराचा फटका बसलेला आह़े त्यामुळे तूर्तास निवडणुका घेणो, योग्य होणार नाही, असे नॅशनल कॉन्फरन्सने म्हटले  आह़े ही निवडणुका घेण्याची वेळ नाही़ कारण जनता पुरामुळे झालेल्या संकटातून अद्यापही सावरलेली नाही़ त्यांचे आयुष्य अद्यापही पूर्वपदाला आलेले नाही, असे या पक्षाचे सरचिटणीस अली मोहम्मद सागर यांनी निवडणूक आयोगाला भेटल्यानंतर पत्रकारांना सांगितल़े काँग्रेस, पीडीपी या पक्षांनी नियोजित कार्यक्रमानुसारच निवडणुका घेण्याची आपली भूमिका स्पष्ट केली़

 

Web Title: There will be further discussions regarding the dates of elections in Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.