मालकीबाबत आज आणखी पुरावे देणार मार्केट जागा वाद : प्रधान सचिवांच्या आदेशावर उशिरापर्यंत चर्चा

By admin | Published: February 5, 2016 12:33 AM2016-02-05T00:33:13+5:302016-02-05T00:33:13+5:30

जळगाव : मनपाच्या फुले, सेंट्रल फुले व शास्त्री टॉवर, वालेचा मार्केटची जागा महसूल विभागाची असल्याच्या महसूल विभागाच्या दाव्यासंदर्भात महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडे शुक्रवारी सुनावणी होणार असल्याने महापालिकेच्या विविध पुरावे सादर करण्यासंदर्भात आयुक्तांच्या उपस्थितीत उशिरापर्यंत बैठक सुरू होती.

There will be more evidence regarding ownership dispute in the market space: the order of the Principal Secretary to the discussion till late | मालकीबाबत आज आणखी पुरावे देणार मार्केट जागा वाद : प्रधान सचिवांच्या आदेशावर उशिरापर्यंत चर्चा

मालकीबाबत आज आणखी पुरावे देणार मार्केट जागा वाद : प्रधान सचिवांच्या आदेशावर उशिरापर्यंत चर्चा

Next
गाव : मनपाच्या फुले, सेंट्रल फुले व शास्त्री टॉवर, वालेचा मार्केटची जागा महसूल विभागाची असल्याच्या महसूल विभागाच्या दाव्यासंदर्भात महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडे शुक्रवारी सुनावणी होणार असल्याने महापालिकेच्या विविध पुरावे सादर करण्यासंदर्भात आयुक्तांच्या उपस्थितीत उशिरापर्यंत बैठक सुरू होती.
मनपा व जिल्हाधिकारी कार्यालय या दोघांनी जागा भाडेप˜्याने दिली की मालकी हक्काने याबाबतचा पुरावा देणारे आणखी कागदपत्र सादर करण्याचे आदेश प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी यापूर्वी दिले होते.
मनपाचे महात्मा फुले, सेंट्रल फुले मार्केट व शास्त्री टॉवर मार्केट असलेली जागा शासनाची असल्याने यावरील मार्केटमधील गाळ्यांबाबत महसूल विभाग निर्णय घेईल, असा निर्णय शासनाने दिला आहे. मात्र मनपाने ही जागा महसूल विभागाने निरंतर वापरसाठी मनपाला दिलेली असून मनपाने कुठलाही शर्तभंग केलेला नाही. त्यामुळे ही जागा आता मनपाचीच असल्याचा दावा केला आहे. गेल्या महिन्यात महसूल विभागाच्या प्रधान सचिवांनी मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित केली होती. त्यात मनपातर्फे नगररचना साहाय्यक संचालक चंद्रकांत निकम तर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे साजिदखान पठाण हे उपस्थित होते. त्यांनी बाजू मांडून कागदपत्र व अहवाल सादर केले. सचिवांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेऊन कागदपत्रांचे अवलोकन केले. मात्र उपलब्ध कागदपत्रांवरून या जागा मालकी हक्काने दिल्या आहेत की भाडेप˜्याने याचा बोध होत नसल्याने पुराव्यासाठी दोन्ही बाजूंनी आणखी कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले.
शुक्रवारी कामकाज
याप्रश्नी शुक्रवारी ५ रोजी याप्रश्नी कामकाज होणार आहे. यावेळीदेखील मनपातर्फे सहाय्यक संचालक चंद्रकांत निकम हे मुंबईत जाणार आहेत. द्यावयाचे पत्र व अन्य काही पुराव्यांसदर्भात १५ व्या मजल्यावर उशिरापर्यंत बैठक सुरू होती. आयुक्त कापडणीस, उपायुक्त जगताप, चंद्रकांत निकम व अन्य अधिकारी यासाठी उशिरापर्यंत थांबून होते.

Web Title: There will be more evidence regarding ownership dispute in the market space: the order of the Principal Secretary to the discussion till late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.