मोदींच्या श्रीलंकेच्या दौऱ्यात द्विपक्षीय करार होणार नाहीत
By Admin | Published: May 1, 2017 03:54 AM2017-05-01T03:54:32+5:302017-05-01T03:54:32+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या श्रीलंकेच्या दौऱ्यात कोणत्याही द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी होणार
कोलंबो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या श्रीलंकेच्या दौऱ्यात कोणत्याही द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी होणार नाही. मोदी संयुक्त राष्ट्रांच्या ‘वेसक डे’ कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ही माहिती श्रीलंकेचे अध्यक्ष मैथरिपला सिरिसेना यांनी शनिवारी येथे कार्यक्रमात दिली. मोदी यांच्या श्रीलंकेच्या दौऱ्यासंदर्भात समाजमाध्यमांवर चुकीची माहिती दिली जात असल्याची मला कल्पना आहे, असे सिरिसेना म्हणाले. भगवान बुद्धांचा जन्म, त्यांना झालेले दिव्य ज्ञान व मृत्यू याच्याशी संबंधित ‘वेसक डे’ १२ ते १४ मेदरम्यान श्रीलंकेत साजरा होत आहे.