महाराष्ट्रात होणार तीन गोकुल ग्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 04:46 AM2020-03-04T04:46:23+5:302020-03-04T04:46:28+5:30
पालघर, पोहरा व ताथवड्यामध्ये गोकुल ग्राम उभारण्यात येतील. ज्यात गोवंश संशोधन केले जाते.
नवी दिल्ली : राष्ट्रीय गोकुल मिशन अंतर्गत महाराष्ट्रात तीन गोकुलग्राम उभारणीसाठी निधी दिल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. हेमंत गोडसे यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता. पालघर, पोहरा व ताथवड्यामध्ये गोकुल ग्राम उभारण्यात येतील. ज्यात गोवंश संशोधन केले जाते.
शेतकऱ्यांना मदत नाहीच
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र निधी देण्यात आला नसल्याचे कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले. बाळू धानोरकरांनी विचालेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. राज्य आपत्ती निवारण निधीच्या दहा टक्के रक्कम शेतकºयांना देता येईल, असेही उत्तरात म्हटले आहे.
नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजाणीची तयारी पूर्ण झाल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी धानोरकरांच्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले आहे. धोरणासाठी २ लाख सूचना आल्या. विविध राज्यांशी गतवर्षी चर्चा केल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. नव्या शैक्षणिक धोरणात राज्यनिहाय कार्ययोजना आहे, अशी विचारणा खासदार धानोरकर यांनी केली होती. या संदर्भात लेखी उत्तरात मनुष्यबळ विकासमंत्री रमेश् पोखरीयाल यांनी ही माहिती दिली. नवे धोरण सर्वसमावेशक राहणार असून यासाठी कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती. या नव्या श्क्षिण धोरणात सर्व घटकांचे विचार केला गेला असल्याचेही, असेही लेखी उत्तरात म्हटले आहे.
केळी नुकसानीचा प्रस्ताव नाही
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकºयांना मदतीची माहिती रक्षा खडसे यांनी विचारली. तापमान १० अंशाच्या खाली गेल्याने केळी पीकाला फटका बसला. ४० हजार ६०० हेक्टर पैकी पाच हजार हेक्टर पीकावर हा परिणाम दिसल्याचे त्यांनी प्रश्नात नमूद केले होते. मात्र केळी निर्यातीवर कोणताही प्रभाव दिसला नाही, शिवाय घटलेल्या तापमानामुळे नुकसान झाल्याचीही माहिती राज्याने कळवली नसल्याचे कृषी मंत्रालयाने उत्तरात स्पष्ट केले.
>साखर कारखान्यांना अडीच हजार कोटी
गतवर्षी केंद्र सरकारने साखर कारखान्यांना ७ हजार ४०३ कोटी रूपयांचे कर्ज दिले. देशातील ३४९ कारखान्यांना त्याचा लाभ झाला. महाराष्ट्रातील १३१ कारखान्यांना कर्जातून २ हजार ७५३ कोटी रूपये मिळाले. सर्वाधिक कारखाने व कर्ज महाराष्ट्रालाच मिळाले आहे. राजन विचारे यांनी यासंबंधी लेखी प्रश्न विचारला होता.