बारा गावांची पाणीटंचाई होणार दूर
By admin | Published: September 16, 2015 11:38 PM2015-09-16T23:38:08+5:302015-09-16T23:38:08+5:30
भोर तालुका : जलयुक्त शिवार योजनेतून भरीव कामे
Next
भ र तालुका : जलयुक्त शिवार योजनेतून भरीव कामेभोर : जलयुक्त शिवार योजनेतंर्गत भोर तालुक्यातील १२ गावांत कृषी छोटे पाटबंधारे, वन विभाग यांच्यासह विविध विभागांकडून विविध प्रकारची १६० कामांपैकी १२८ कामे पूर्ण झाली असून ३२ कामे अपूर्ण आहेत. सदरच्या कामांसाठी सुमारे ४ कोटी ७६ लाख ९९ हजार रुपये खर्च झाला आहे. या कामांमुळे जमिनीत पाणी मुरणार असून बंधार्यात, नाल्यात पाणी साचल्याने भविष्यात या १२ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार आहे.जलयुक्त शिवार योजनेत शिवारात पडलेले पाणी गावात मुरावे, यासाठी भोर तालुक्यातील गृहिणी, महुडेबुद्रुक,पसुरे, कांबरे खे.बा., करंदी खे.बा., वागजवाडी, भोंगवली, ससेवाडी, मोरवाडी, पेंजळवाडी, शिंदेवाडी, वेळू या बारा गावांचा समावेश आहे. या गावात कृषी विभागाकडून सीसीटी, मजगी, बंधारे दुरुस्ती, गाळ काढणे, नाला खोलीकरण, सरळीकरण अशा एकूण १०२ कामांपैकी ७८ कामे पूर्ण झाली असून २४ कामे अपूर्ण आहेत. त्यासाठी एक कोटी २६ लाख ८४ हजार रुपयेखर्च झाला आहे, तर छोटे पाटबंधारे विभागार्तंगत कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, बांधणे गाळ काढणे, बंधार्यांची दुरुस्ती करणे, अशी ७ पैकी ६ कामे पूर्ण आहेत. एक काम अपूर्ण आहे. त्यासाठी ५४ लाख ६८ हजार रुपये खर्च झाला आहे. वन विभागाकडून एकूण ४५ पैकी ४१ कामे झाली असून ४ कामे अपूर्ण आहेत. २ कोटी १० लाख ६३ हजार रुपये खर्च झाला आहे.पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून फक्त दोन कामे घेण्यात आली असून त्यासाठी ५० लाख ५२ हजार रुपये खर्च झाला आहे; मात्र दोन्ही कामे अपूर्ण आहेत. जलसंधारण स्थानिक स्तर अंतर्गत ४ पैकी एक अपूर्ण तर तीन कामे पूर्ण आहेत. ३४ लाख ६२ हजार खर्च झाला आहे, असा एकूण १६० कामांपैकी १२८ कामे पूर्ण तर ३२ कामे अपूर्ण असून सुमारे ४ कोटी ७६ लाख ९९ हजार रुपयेखर्च झाला आहे.भोर तालुक्यात सर्वाधिक ४० कामांसाठी सुमारे एक कोटी ६ लाख ८९ हजार रुपये खर्च भांेगवली गावात झाला आहे. मात्र पेंजळवाडीत एकही काम झाले नसून एक रुपयाही खर्च झाला नाही. कृषी विभागाकडून सर्वाधिक १०२ कामे झाली असून सर्वांत कमी कामे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून २ कामे झाली आहेत.चौकट..तर पाणीटंचाई दूर होऊ शकतेजलयुक्त शिवार योजनेतील या बारा गावांत झालेल्या विविध प्रकारच्या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरले आहे. बंधार्यात पाणी साचले आहे. यामुळे दर उन्हाळ्यात होणार्या पाणीटंचाईवर मात करता येणार आहे; तर काही गावांत शेतीलाही या पाण्याचा उपयोग होणार आहे. सामाजिक वनीकरण व भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून एकही हाती घेण्यात आले नाही, तर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ग्रामीण भागातील गावात शिवकालीन साठवण विहीर, विहीर गाळ काढणे, पाईपलाईन दुरुस्ती ही कामे घेऊन दर उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर करता येऊ शकते. मात्र ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सावळा गोंधळ व उपअभियंता शाखा अभियंता यांच्या दुर्लक्षामुळे कामे हाती घेण्यात आली नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. कोटससेवाडी येथे चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडून लोकवर्गणी भरून नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे ३९ लाख ७२ हजार रुपयेमंजूर झाले आहे. तिचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर तीन वर्षांपूर्वी वेळू गावासाठी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे २ कोटी ३६ लाख रुपये मंजूर आहे. त्यातील १० लाख ५० हजार रुपयांचे विहिरीचे काम झाले. ही दोन्ही कामे एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या जलयुक्त शिवार अभियानात ग्रामीण पाणीपुरवठाविभागाकडून दाखविण्यात आली आहेत. म्हणजे केवळ काही तरी कामे दिसावीत म्हणून, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने खोटी कामे दाखवली आहेत. या कामांचा जलयुक्त शिवार योजनेशी काहीही संबंध नाही. - धनाजी वाडकर, बाजार समिती संचालकफोटो ओळ : जलयुक्त शिवार योजनेतील कामांमुळे वेळू येथे बंधार्यात साठलेले पाणी.