Video: ... म्हणून वेदना सहन केल्या, चक्क मुख्यमंत्र्यांच्या हातावर चाबकाचे फटके
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 11:33 AM2022-10-25T11:33:10+5:302022-10-25T11:35:34+5:30
गावात दरवर्षी अशाप्रकारेच लक्ष्मीपूजन पूजा केली जाते. यावेळी, गावातील एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या हातावर चाबकाचे ५ फटके मारले
रायपूर - दिवाळीतील गौरी पूजेदरम्यान छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांच्या हातावर लहान चाबकाचे ५ फटके मारण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. येथील प्रथा परंपरेनुसार लक्ष्मीपूजनानिमित्त आयोजित सोहळ्यात ही परंपरा जपण्यात आली आहे. हातावर फटके मारल्यानंतर सुख-शांती येते अशी धारणा येथील परंपरेची आहे. त्यातूनच, मुख्यमंत्र्यांनी या वेदना सहन करत जनतेच्या आयुष्यात आनंद आणि सुख यावे, ही मनोकामना केली.
गावात दरवर्षी अशाप्रकारेच लक्ष्मीपूजन पूजा केली जाते. यावेळी, गावातील एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या हातावर चाबकाचे ५ फटके मारले. त्यावेळी, ५ फटक्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हात जोडून सर्वांना अभिवादन केले. तर, चाबुक मारणाऱ्या व्यक्तीने हात जोडून नमस्कार केला. चाबकाचे फटके मारण्याची प्रथा छत्तीसगडच्या प्रत्येक लहान-सहान गावांत आणि लक्ष्मी पूजन सोहळ्याच्या ठिकाणी केली जाते. काही वेदना स्विकारत देवाप्रती आपली भक्ती दाखवण्याचा हा प्रयत्न असतो. या परंपरेनुसार आपल्यावरील संकट देव दूर करतो.
#WATCH भिलाई: छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री भूपेश बघेल पर दुर्ग में 'गौरी-गौरा पूजा' के अवसर पर एक रस्म के दौरान सोंटे से प्रहार किया गया। pic.twitter.com/EqijSXLwhU
— ANI_HindiNews (@AHindinews) October 25, 2022
दरम्यान, दिवाळीच्या मुहूर्तावर छत्तीसगडमध्ये लक्ष्मीपूजन म्हणजेच शंकर पार्वतीच्या पूजनाला अधिक महत्त्व आहे. शंकर-पार्वतीच्या पूजनानंतर गावातून सवाद्य मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत गावकऱ्यांचा नाचत, गाणे म्हणत सहभाग पाहायला मिळतो.