या 2 अभयारण्यांमध्ये आहेत 58 वाघ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 04:04 PM2017-08-18T16:04:29+5:302017-08-18T16:07:48+5:30
केरळमधील पेरियार आणि परम्बिकुलम वाघ अभयारण्यात वाघांची एकूण संख्या 58 असल्याची माहिती केरळच्या वनमंत्र्यांनी दिली आहे.
तिरुअनंतपुरम, दि. 18 - केरळमधील पेरियार आणि परम्बिकुलम वाघ अभयारण्यात वाघांची एकूण संख्या 58 असल्याची माहिती केरळच्या वनमंत्र्यांनी दिली आहे. वर्ष 2016 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार या अभयारण्यांमध्ये वाघांची एकूण संख्या 58 असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत माहिती दिली. वनमंत्री राजू यांनी सांगितले की, क्षेत्रीय स्तरावरील सर्व्हेक्षणानुसार वाघांच्या संख्येनुसार पेरियार आणि परम्बिकुलम अभयारण्यात वाघांच्या संख्या अनुक्रमे 33 व 25 एवढी आहे. त्यांनी सांगितले की, वर्ष 2016 साली कॅमेराच्या मदतीनं करण्यात आलेल्या देखरेखीच्या आधारावर वाघांचा आताचा आकडा समोर आला आहे.
वर्ष 2010मध्ये राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार समोर आलेल्या वाघांच्या आकडेवारीनुसार 634 चौरस फुटांवर पसरलेल्या परम्बिकुलम अभयारण्यात 38 आणि 925 चौरस फुटांवर परसलेल्या पेरियार अभयारण्यात 34 वाघ होते. तर गेल्या वर्षभरात 10 हत्ती, 5 माकड आणि एक बिबट्या अशा एकूण 21 वन्यजीवांचा मृत्यू झाला आहे. विधानसभेत वाघांची आकडेवारीची माहिती देत असताना वनमंत्री राजू यांनी वन्यजीवांच्या हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला,याचीही माहिती दिली.
राज्यातील वनक्षेत्रात येणा-या परिसरात झालेल्या प्राणी व मानव संघर्षासंदर्भात वनमंत्री राजू यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात वायनाड जिल्ह्यात निरनिराळ्या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला होता तर 39 जण जखमी झाले होते.