नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात 'हे' पक्ष सहभागी होणार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 05:21 PM2023-05-24T17:21:30+5:302023-05-24T17:21:42+5:30

inauguration of the new parliament : 20 विरोधी पक्षांनी या उद्घाटन समारंभात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे.

these 20 parties will not participate in the inauguration of the new parliament house | नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात 'हे' पक्ष सहभागी होणार! 

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात 'हे' पक्ष सहभागी होणार! 

googlenewsNext

नवी दिल्ली : 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. यावरून राजकारण तापले आहे. 20 विरोधी पक्षांनी या उद्घाटन समारंभात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. यामागे वेगवेगळ्या नेत्यांचे आपापले तर्क आहेत. दुसरीकडे, भाजपशिवाय इतर 17 पक्ष नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत. तर सध्या एआयएमआयएम आणि बीआरएसची स्थिती स्पष्ट नाही. मात्र, अशी माहिती समोर येत आहे की, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा अध्यक्षांनी नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यास आमचा पक्ष सहभागी होईल, अन्यथा आम्ही बहिष्कार टाकू, असे म्हटले आहे.

भाजप व्यतिरिक्त वायएसआर काँग्रेस, बीजेडी, बसपा, एलजेपी, टीडीपी, अपना दल (सोनेलाल), अकाली दल, शिरोमणी अकाली दल (अमृतसर), एजेएसयू, एआयडीएमके, एआययूडीएफ, जेडीएस, मिझो नॅशनल पार्टी, नागा पीपल्स फ्रंट, एनडीपीपी, आरएलपी. आणि एसकेएमचे खासदार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पण 20 पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. आज विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले की, या सरकारच्या कार्यकाळात संसदेच्या आत्म्यावर वारंवार हल्ला झाला. राष्ट्रपतींना या समारंभापासून दूर ठेवण्यात आले, हे 'अशोभनीय कृत्य' आहे. त्यामुळेच नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही सर्व नेत्यांनी घेतला आहे.

काँग्रेसशिवाय, टीएमसी, डीएमके , जेडीयू, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय जनता दल, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फरन्स, केरळ काँग्रेस(मणि), राष्ट्रीय लोक दल, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, विदुथलाई चिरुथैगल काची, मारुमालार्ची द्रविड मुनेत्र कळघम या पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

दरम्यान, आज गृहमंत्री अमित शाह यांनीही नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाबाबत माहिती दिली. नवीन संसद भवनात राजदंड स्थापन करण्यात येणार आहे. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री जवाहरलाल नेहरूंच्या हाती सत्ता हस्तांतरित करण्याचे हे प्रतीक आहे. चोल राजघराण्यापासून ही परंपरा चालत आली होती. त्याचे नाव सेंगोल असे दिले आहे. सेंगोल हे तामिळ नाव आहे, ज्याचा अर्थ संपत्तीने संपन्न आहे. आतापर्यंत सेंगोल (राजदंड) प्रयागराज संग्रहालयात ठेवण्यात आला होता, परंतु आता तो संसदेच्या नवीन इमारतीमध्ये स्पीकरच्या आसनाजवळ ठेवण्यात येणार आहे. याबाबतचा संपूर्ण इतिहास अमित शाह यांनी आज सांगितला. दरम्यान, 20 पक्षांनी संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. नव्या संसदेची स्थापना निरंकुश पद्धतीने झाली आहे, असे विरोधकांनी म्हटले आहे.

Web Title: these 20 parties will not participate in the inauguration of the new parliament house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Parliamentसंसद