हे आहेत नेकेड झोपण्याचे फायदे
By admin | Published: April 14, 2017 05:13 PM2017-04-14T17:13:55+5:302017-04-14T17:13:55+5:30
रात्री झोपताना अनेकजण सैलसर कपडे अंगात घालतात. जेणेकरुन शरीराला मोकळेपणा जाणवावा. पण तुम्हाला हे माहित आहे का ?
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - रात्री झोपताना अनेकजण सैलसर कपडे अंगात घालतात. जेणेकरुन शरीराला मोकळेपणा जाणवावा. पण तुम्हाला हे माहित आहे का ?विवस्त्र म्हणजेच नेकेड झोपणे प्रकृतीसाठी उत्तम असते. नेकेड झोपण्याचा सल्ला देणे हा अनेकांसाठी थट्टेचा, विनोदाचा विषय असेल. पण नेकेड झोपण्याचे काही फायदेही आहेत.
झोपेचा थेट आरोग्याशी संबंध असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे. पुरेशी झोप झाली नाही तर, प्रकृतीच्या वेगवेगळया समस्या उदभवतात. रोज तुम्ही पाच तासांपेक्षा कमी झोपत असाल तर, प्रॉस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते असे अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या संशोधनातून समोर आले आहे.
शांत झोप
झोपताना अंगावरील कपडे कधीकधी त्रासदायक ठरतात. ज्यामुळे झोपमोड होते. शरीर नेकेड असल्यास शांत झोप लागते. रात्री झोपताना शरीराचे तापमान कमी असावे लागते. नेकेड झोपल्यामुळे शरीराचे तापमान कमी रहाते. दुस-या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला जास्त फ्रेशनेस जाणवतो.
गुप्तांगासाठी चांगले
जाड, घट्ट कपडे घालून झोपणे जंतूंना एकप्रकारे निमंत्रण असते. त्यामुळे संसर्ग (इन्फेक्शन) होण्याचा धोका असतो. नेकेड स्लीपमुळे अशा कुठल्या संसर्गाचा धोका रहात नाही तसेच शरीराला सुद्धा मोकळेपणा जाणवतो.
त्वचेसाठी चांगले
रात्रीच्यावेळी शरीराचे तापमान जास्त असेल तर, शरीरात बनणा-या मेलॅटोनिन हार्मोनच्या निर्मितीमध्ये अडथळा येतो. मेलॅटोनिन त्वचेचा ताजेपणा टिकवून ठेवते. ज्यामुळे तुम्ही तरुण दिसता. नेकेड झोपल्यानंतर शरीराचे तापमान कमी होते आणि मेलॅटोनिनच्या निर्मितीत कुठलाही अडथळा येत नाही.