२०२४ मध्ये अशा असतील सुट्ट्या, पाहा कधी असेल होळी, दसरा आणि दिवाळीची सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 09:27 AM2023-12-26T09:27:35+5:302023-12-26T09:29:39+5:30

Holidays In 2024: केंद्र सरकारने २०२४ साठी गॅझेटेड सुट्ट्या म्हणजेच राजपत्रित सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. केंद्र सरकारच्या या यादीमध्ये १७ अनिवार्य सुट्ट्यांचा समावेश आहे.

These are the holidays in 2024, see when Holi, Dussehra and Diwali will be | २०२४ मध्ये अशा असतील सुट्ट्या, पाहा कधी असेल होळी, दसरा आणि दिवाळीची सुट्टी

२०२४ मध्ये अशा असतील सुट्ट्या, पाहा कधी असेल होळी, दसरा आणि दिवाळीची सुट्टी

२०२३ या वर्षाला निरोप देऊन २०२४ या नव्या वर्षाचे स्वागत करण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत. लोकांनी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. यादरम्यान केंद्र सरकारने २०२४ साठी गॅझेटेड सुट्ट्या म्हणजेच राजपत्रित सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. केंद्र सरकारच्या या यादीमध्ये १७ अनिवार्य सुट्ट्यांचा समावेश आहे. कार्मिक मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये १७ राजपत्रित सुट्ट्या आणि इतर ३१ सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  

केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या अनिवार्य सुट्ट्यांची यादी पुढील प्रमाणे आहे. 
१) प्रजासत्ताक दिन - २६ जानेवारी  
२) होळी  - २५ मार्च 
३) गुड फ्रायडे - २९ मार्च 
४) ईद उल फितर - ११ एप्रिल 
५) राम नवमी - १७ एप्रिल 
६) महावीर जयंती - २१ एप्रिल 
७) बुद्ध पौर्णिमा - २३ मे 
८) बकरी ईद - १७ जून 
९) मोहरम - १७ जुलै 
१०) स्वातंत्र्य दिन - १५ ऑगस्ट 
११) जन्माष्टमी - २६ ऑगस्ट
१२) ईद ए मिलाद - १६ सप्टेंबर 
१३) गांधी जयंती - २ ऑक्टोबर  
१४) दसरा - १२ ऑक्टोबर
१५) दिवाळी - ३१ ऑक्टोबर 
१६) गुरू नानक जयंती - १५ नोव्हेंबर
१७) नाताळ - डिसेंबर 

महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या सुट्ट्या 
१) शिवजयंती - १९ फेब्रुवारी 
२) महाशिवरात्री - ६ मार्च  
३) गुढीपाडवा - ९ एप्रिल
४) गणेश चतुर्थी - ७ सप्टेंबर  

Web Title: These are the holidays in 2024, see when Holi, Dussehra and Diwali will be

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.