श्रीरामजन्मभूमी आंदाेलनाचे हे आहेत प्रमुख शिलेदार; राजकारणापासून दूर राहत साध्य केले कार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 08:18 AM2024-01-22T08:18:21+5:302024-01-22T08:18:30+5:30

महंत रामचंद्रदास परमहंस हे १९४९पासून १९९२ मध्ये बाबरी विध्वंस हाेईपर्यंत मुख्य भूमिकेत राहिले.

These are the main shilledars of Shri Ram Janmabhoomi Andaelana; Stay away from politics and achieve work | श्रीरामजन्मभूमी आंदाेलनाचे हे आहेत प्रमुख शिलेदार; राजकारणापासून दूर राहत साध्य केले कार्य

श्रीरामजन्मभूमी आंदाेलनाचे हे आहेत प्रमुख शिलेदार; राजकारणापासून दूर राहत साध्य केले कार्य

श्रीरामजन्मभूमी आंदाेलनाचे हे आहेत प्रमुख शिलेदार; राजकारणापासून दूर राहत साध्य केले कार्य

महंत रामचंद्रदास परमहंस
महंत रामचंद्रदास परमहंस हे १९४९पासून १९९२ मध्ये बाबरी विध्वंस हाेईपर्यंत मुख्य भूमिकेत राहिले. अखेरच्या क्षणापर्यंत ते श्रीराम मंदिर निर्माणासाठी संघर्ष करीत हाेते. 

अशाेक सिंघल
विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशाेक सिंघल यांनी श्रीराम मंदिर आंदोलनात मध्यवर्ती भूमिका पार पाडली. त्यांच्याच नेतृत्वात आंदाेलनाला धार आली. 

देवराहा बाबा
आंदाेलनात देवराहा बाबा हे आघाडीवर हाेते. त्यांच्याच आदेशानंतर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वादग्रस्त ठिकाणाचे कुलूप उघडल्याचे बाेलले जाते.

महंत अवैद्यनाथ
आंदाेलनात श्रीरामजन्मभूमी यज्ञ समितीचे पहिले अध्यक्ष महंत अवैद्यनाथ यांचीही माेठी भूमिका राहिली आहे. मंदिर निर्माणासाठी रामजन्मभूमी न्यासाचे ते अध्यक्षही हाेते. 

महत्त्वाची भूमिका पार पाडलेले राजकीय नेते

लालकृष्ण अडवाणी
श्रीराम मंदिर निर्माणाला राजकारणाचा प्रमुख केंद्रीय मुद्दा बनविण्यात लालकृष्ण अडवाणी यांची महत्त्वपूर्ण भूमिका हाेती. रथयात्रा काढून आंदाेलनाला राजकीय मुद्दा बनविले. 

कल्याणसिंह
बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी कल्याणसिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हाेते. वास्तू पाडल्यानंतर कल्याणसिंह यांचे सरकार बरखास्त करण्यात आले. 

मुरली मनाेहर जाेशी
मुरली मनाेहर जाेशी यांनीही या आंदाेलनात प्रमुख भूमिका पार पाडली. अडवाणी यांच्याप्रमाणेच त्यांनाही वास्तू पाडण्याच्या प्रकरणात आराेपी बनविण्यात आले. 

उमा भारती
आंदाेलनात उमा भारती या विविध जनसभांमध्ये विहिंप आणि भाजपच्या प्रमुख वक्त्यांमध्ये समाविष्ट हाेत्या. १९९० आणि १९९२ च्या आंदाेलनात त्यांची सक्रिय भूमिका हाेती. 

Web Title: These are the main shilledars of Shri Ram Janmabhoomi Andaelana; Stay away from politics and achieve work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.