हे आहेत भारतातील टॉप स्मार्टफोन ब्रँड !
By Admin | Published: February 14, 2017 05:45 PM2017-02-14T17:45:32+5:302017-02-14T17:53:08+5:30
सध्या सर्वत्र डिजीटल होत असल्यामुळे मोबाईल कंपन्यामध्येही रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. भारतीय मोबाईल मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात स्मार्टफोनची विक्री होत आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - सध्या सर्वत्र डिजीटल होत असल्यामुळे मोबाईल कंपन्यामध्येही रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. भारतीय मोबाईल मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात स्मार्टफोनची विक्री होत आहे.
अनेक कंपन्यांनी ग्राहकांच्या पसंतीला उतरतील असे स्मार्टफोन मार्केटमध्ये आणले आहेत. सध्या भारतीय मोबाईल मार्केटमध्ये सॅमसंग, शिओमी, लेनोवो, ओपो आणि विवो या कंपन्याच्या स्मार्टफोनची आवक वाढली आहे.
सॅमसंग - भारतीय मोबाईल मार्केटमध्ये सध्या सॅमसंग कंपनीच्या स्मार्टफोनची चलती आहे. तिमाहीत 25.1 टक्के सॅमसंगच्या स्मार्टफोनची विक्री झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, साऊथ कोरियनच्या या कंपनीला जागतिक मोबाईल मार्केटमध्ये म्हणावे, तसे यश मिळाले नाही. जागतिक मार्केटमध्ये टॉपला आयफोन आहे.
शिओमी - चीनमधील शिओमी कंपनीने स्मार्टफोन भारतातील मोबाईल मार्केटमध्ये दुस-या स्थानावर आहेत. गेल्या काही महिन्यापासून शिओमीच्या स्मार्टफोनची आवक भारतात मोठ्याप्रमाणात झाल्याचे दिसून आले. सध्या भारतातील मार्केटमध्ये तिमाहीत 10.7 टक्के इतकी विक्री झाली आहे.
लेनोवो - भारतीय मोबाईल मार्केटमधील गेल्या तिमाहीमध्ये लेनोवोच्या स्मार्टफोनची चलती होती. मात्र, आत्ताच्या तिमाहीत घसरली आणि दुस-या स्थानावरुन तिस-या स्थानवर येऊन पोहचली. या स्मार्टफोनची तिमाहीत 9.9 टक्के विक्री झाली आहे.
ओपो - ओपो स्मार्टफोन कंपनी ही चीनची असून भारतीय मार्केटमध्ये चौथ्या स्थानावर आहे. मार्केटमधील तिमाहीत 8.6 टक्के इतक्या स्मार्टफोनची विक्री झाली आहे. याचबरोबर जागतिक मार्केटमध्ये सुद्धा ओपोच्या स्मार्टफोनची आवक वाढली आहे.
विवो - भारतीय मोबाईल मार्केटमध्ये पाचव्या स्थानावर विवो स्मार्टफोन आहे. विवो चीनस्थित कंपनी असून भारतात मोठ्याप्रमाणात स्मार्टफोनची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, गेल्या काही दिवसापूर्वी या कंपनीने भारतात स्मार्टफोनची निर्मिती करण्याचे घोषित केले आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून स्मार्टफोन विक्री करण्यावर भर देण्यात येत आहे. सध्याच्या तिमाहीत 7.6 टक्के इतकी या स्मार्टफोनची विक्री झाली आहे.