"रामजन्मभूमीत सापडलेले हे अवशेष म्हणजे आम्हाला हिंदू तालिबान म्हणणाऱ्यांना मिळालेले उत्तर’’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 03:58 PM2020-05-21T15:58:27+5:302020-05-21T16:00:37+5:30

सर्वोच्च न्यायालयातील चर्चेदरम्यान, आमच्यावर हिंदू तालिबान असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच तिथे मंदिराचे कुठलेही अवशेष नाहीत, असा दावाही करण्यात आला होता.

"These remnants found in the Ram Janmabhoomi are the answer to opposition" BKP | "रामजन्मभूमीत सापडलेले हे अवशेष म्हणजे आम्हाला हिंदू तालिबान म्हणणाऱ्यांना मिळालेले उत्तर’’

"रामजन्मभूमीत सापडलेले हे अवशेष म्हणजे आम्हाला हिंदू तालिबान म्हणणाऱ्यांना मिळालेले उत्तर’’

Next

अयोध्या - अयोध्येतील रामजन्मभूमीमध्ये मंदिराच्या बांधकामासाठी जमिनीचे सपाटीकरण सुरू असताना प्राचीन मंदिराचे आणि देवदेवतांचे अवशेष सापडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, हे अवशेष सापडल्यानंतर रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी असलेल्या हिंदू महासभेच्या वकिलांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. हे अवशेष म्हणजे आम्हाला हिंदू तालिबान म्हणणणाऱ्यांना मिळालेले उत्तर आहे, अशी प्रतिक्रिया हिंदू महासभेचे वकील विष्णू जैन यांनी दिली आहे.

हिंदू महासभेचे वकील विष्णू जैन म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयातील चर्चेदरम्यान, आमच्यावर हिंदू तालिबान असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच तिथे मंदिराचे कुठलेही अवशेष नाहीत, असा दावाही करण्यात आला होता. मात्र आता तिथे सापडलेल्या प्राचीन मूर्ती हा सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या त्या आरोपांचे उत्तर आहे.

त्या जागेवर एका मोठ्या मंदिराचे अवशेष होते, असे एएसआयने आपल्या अहवालात नमूद केले होते. बाबरी मशिदीच्या खाली राम मंदिराचे मोठे बांधकाम होते. आज मिळालेले अवशेष हा आम्ही सर्वोच्च न्यायालयात केलेला दावा किती भक्कम होता हे सिद्ध करणारे आहेत, असेही जैन यांनी सांगितले.

दरम्यान, देशातील राजकीय आणि सामाजिक वादाचे केंद्र बनलेल्या रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत हा वाद संपुष्टात आणला होता. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने समोर आलेले पुरावे विचारात घेऊन ती वादग्रस्त जागा राम जन्मभूमीच असल्याचे मान्य केले होते.

आता त्या जागी राम मंदिराच्या बांधणीचे काम सुरू झाले असून, त्यासाठी जागेचे सपाटीकरण करत असताना तिथे प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहे. येथे मंदिराचे अवशेष सापडल्याच्या वृत्ताला राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दुजोरा दिला आहे. लॉकडाऊनमुळे राम मंदिराच्या कामास उशीर होत होता. त्यामुळे ११ मेपासून येथे कामास सुरुवात करण्यात आली आहे. 

या कामादरम्यान, रामजन्मभूमी परिसरामध्ये काही प्राचीन अवशेष सापडले आहेत. यामध्ये देवी-देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती, पुष्प कलश, अम्लक, दोरजाम्ब ७ ब्लॅक टच स्टोनचे स्तंभ आणि ६ रेड सँड स्टोनचे स्तंभ आणि ५ फूट आकाराचे नक्षीकाम केलेल्या शिवलिंगाचा समावेश आहे, अशी माहिती ट्र्स्टच्यावतीने देण्यात आली.

 

Web Title: "These remnants found in the Ram Janmabhoomi are the answer to opposition" BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.