या सात स्मार्टफोनचं लवकरच होणार भारतात आगमन

By admin | Published: March 14, 2017 06:19 PM2017-03-14T18:19:15+5:302017-03-14T18:37:13+5:30

स्मार्टफोन वापरणा-या भारतीयांसाठी एक खुशखबर आहे. येत्या काही दिवसात भारतीय मोबाईल मार्केटमध्ये मस्त आणि कूल असे सात स्मार्टफोन येत आहेत.

These seven smartphones will soon arrive in India | या सात स्मार्टफोनचं लवकरच होणार भारतात आगमन

या सात स्मार्टफोनचं लवकरच होणार भारतात आगमन

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - स्मार्टफोन वापरणा-या भारतीयांसाठी एक खुशखबर आहे. येत्या काही दिवसात भारतीय मोबाईल मार्केटमध्ये मस्त आणि कूल असे सात स्मार्टफोन येत आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी बार्सिलोना येथे मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मोबाईल कंपन्यांकडून विकसित करण्यात आलेले नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले. यामध्ये नोकिया, एलजी, लिनोव्हा, ह्युवाई, सोनी आदी मोबाईल कंपन्यांसह अनेक नामांकित मोबाईल कंपन्यांनी सहभाग घेतला होता.
दरम्यान, यामधील काही स्मार्टफोन भारतात दाखल होणार आहेत. त्यातील काही स्मार्टफोन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत.
 
नोकिया 6 -  गेल्या जानेवारी महिन्यात चीनमध्ये नोकिया 6 या स्मार्टफोनचे लॉन्चिग करण्यात आले होते. आता नोकिया 6 लवकरच भारतात दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, या फोनमध्ये 64 जीबी इंटरनल मेमरी आणि 3 जीबी रॅम आहे.  अँड्रॅाईड Nougat out-of-the-box ऑपरेटिंग सिस्टिम आहे. स्क्रीन साईज 5.5 इंच असून फुल एचडी आहे. तर, 16 मेगापिक्सल रियर-कॅमेरा आणि  8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. तसेच, बॅटरी 3,000mAh इतकी आहे. 
 
 
मोटो जी 5 - लिनोव्होची मालकी असलेल्या मोटोरोलाच्या मोटो जी 4 नंतर आता भारतात मोटोरोलाचा मोटो जी 5 लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन मध्यम रेंजमधील असून या फोनची साईज 5.2 इंच असून फुल एचडी डिसप्ले आहे. तसेच, इंटरनल मेमरी 64 जीबीपर्यंत आहे. तर, बॅटरी 3,000mAh इतकी आहे. 
 
 
एलजी जी 6 - गेल्या वर्षी एलजी कंपनीने जी 5 भारतात आणला होता. याच्या विक्रमी विक्रीनंतर पुन्हा एलजी कंपनी जी 6 स्मार्टफोन घेऊन येत आहे. याचबरोबर जी 6 हा जगातील पहिलाच Dolby Vision technology असलेला स्मार्टफोन असल्याचा दावा एलजी कंपनीने केला. हा स्मार्टफोन 5.7 इंच इतका असून 'FullVision' Quad HD+ डिसप्ले आहे. यामध्ये Qualcomm’s Snapdragon 821 SoC प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम आहे. तर 32 जीबी इंटरनल मेमरी आणि बॅटरी 3,300mAh इतकी आहे. 
 
ह्युवाई पी 10 - येत्या काही महिनाभरात भारतीय मोबाईल मार्केटमध्ये ह्युवाई कंपनीचा पी 10 हा स्मार्टफोन येणार आहे. या स्मार्टफोनची साईज 5.1 इंच असून डिसप्ले फुल एचडी आहे. तर, octa-core Kirin 960 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम आहे. तसेच, बॅटरी 3,200mah इतकी आहे.
 
सोनी एक्सपिरिया XZ Premium - सोनी कंपनीने भारतात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एक्सपिरिया XZ आणला होता. याच्या यशानंतर पुन्हा सोनी कंपनी एक्सपिरिया XZ Premium घेऊन येत आहे. या स्मार्टफोनची साईज 5.5 इंच इतकी असून 4K resolution असलेला डिसप्ले आहे. तर, Qualcomm Snapdragon 835 SoC प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम आहे. 19 मेगापिक्सल रियर-कॅमेरा आणि 13 मेगापिक्सल समोरील कॅमेरा आहे. बॅटरी  3,230mAh इतकी आहे.
 
ब्लॅकबेरी केईवाय वन - ब्लॅकबेरी कंपनीचा केईवाय वन स्मार्टफोन लवकरच भारतात येणार आहे. या स्मार्टफोनची साईज 4.5 इंच असून फुल एचडी डिसप्ले आहे. तर प्रोसेसर Qualcomm Snapdragon 625 SoC असून 3 जीबी रॅम आहे. तसेच, 32 जीबी इंटरनल मेमरी असून मेमरी कार्डचा सुद्धा वापर करता येणार आहे.  12 मेगापिक्सल रियर-कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा आहे. बॅटरी  3,505mAh इतकी आहे.
 
नोकिया 3310 - भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला नोकियाचा 3310 हा  हँडसेट पुन्हा मार्केटमध्ये येतोय. फेब्रुवारीला बार्सिलोना येथे झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकिया 3310 (2017) या स्मार्टफोन झलक दाखविण्यात आली असून लवकरच भारतात येणार आहे. सर्व सामान्यांना परवडेल अशा किंमतीत असणा-या या  स्फोटफोनची स्क्रीन साईज 2.4  इंच असून QVGA डिसप्ले आहे. तर 2 मेगापिक्सल रियर-कॅमेरा आहे. तसेच, मेमरी कार्ड सुद्धा वापरता येणार आहे. 

Web Title: These seven smartphones will soon arrive in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.