‘ते व्हिसासाठी मात्र गोऱ्यांसमोर नग्न होतात!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 06:18 AM2018-03-26T06:18:31+5:302018-03-26T06:18:31+5:30
अमेरिकेचा व्हिसा मिळविण्यासाठी लोक दहा पानांचा अर्ज भरतात
नवी दिल्ली : आधारच्या माहितीचीही चोरी झाली आहे अशी बातमी झळकल्यानंतर संतप्त झालेल्या केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री के. जे. अल्फोन्स यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. ते म्हणाले की, अमेरिकेचा व्हिसा मिळविण्यासाठी लोक दहा पानांचा अर्ज भरतात. त्यासाठी बोटांचे ठसे द्यायला, गो-या माणसांसमोर नग्न व्हायला कोणाचीही हरकत नसते. पण जेव्हा आधारसारख्या क्रांतिकारक प्रकल्पासाठी तुमचेच सरकार तुम्हाला नाव व पत्ता विचारते तेव्हा हे आमच्या खासगी आयुष्यावर आक्रमण आहे अशी टीका केली जाते. ती योग्य नाही. नमो अॅप वापरणाºया भारतीयांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकी कंपन्यांतील त्यांच्या मित्रांना देतात असा आरोप काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.
सरकार माहितीचा दुरुपयोग करण्याची शक्यता - येचुरी
अल्फोन्स यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी म्हणाले की, लोक आपली माहिती द्यायला उत्सुक आहेत की नाही हा मुद्दा महत्वाचा नाही. पण आधारच्या निमित्ताने सरकार लोकांची जी माहिती गोळा करीत आहे त्या हेतूबद्दल शंका येते. केंद्र सरकार या माहितीचा निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी उपयोग करण्याची भीती आहे.