ते चौघे दहीहंडीफेम नेत्याच्या छत्राखाली * परमार आत्महत्या प्रकरण
By admin | Published: October 28, 2015 10:37 PM2015-10-28T22:37:53+5:302015-10-28T22:37:53+5:30
ठाणे, अजित मांडके : कॉसमॉस ग्रुपचे मालक सुरज परमार यांच्या आत्महत्येसंदर्भात अटकेची टांगती तलवार मानेवर असलेल्या नगरसेवकांच्या चौकडीने आपल्यावरील कारवाई टाळण्याकरिता ठाण्यातील एका दहीहंडीफेम नेत्याच्या छत्रछायेचा आसरा घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या आमदाराने उच्च न्यायालयात या नगरसेवकांकरिता चार तज्ज्ञ वकिलांची फौज तयार ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Next
ठ णे, अजित मांडके : कॉसमॉस ग्रुपचे मालक सुरज परमार यांच्या आत्महत्येसंदर्भात अटकेची टांगती तलवार मानेवर असलेल्या नगरसेवकांच्या चौकडीने आपल्यावरील कारवाई टाळण्याकरिता ठाण्यातील एका दहीहंडीफेम नेत्याच्या छत्रछायेचा आसरा घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या आमदाराने उच्च न्यायालयात या नगरसेवकांकरिता चार तज्ज्ञ वकिलांची फौज तयार ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. परमार आत्महत्येप्रकरणी या चौकडीपैकी सुधाकर चव्हाण यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी २९ ऑक्टोबर रोजी आणि विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नजीब मुल्ला, काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांची ३१ रोजी होणार आहे. परंतु, हा जामीन अर्ज फेटाळला तर पुढे काय, असा सवाल उभा राहिल्यानेच या चौकडीने दहीहंडीफेम नेत्याकडे धाव घेतल्याचे नगरसेवकांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. *मनसे, काँग्रेसने केले हात वरपरमार प्रकरणात मनसेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादीचे हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला यांची नावे पुढे आल्यानंतर मनसे आणि काँग्रेसने या प्रकरणात हात वर केले आहेत. या प्रकरणाशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याची भूमिका या दोन्ही पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे या दोन नगरसेवकांपुढील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मदतीने त्या दहीहंडीफेम नेत्याला शरण जाण्याचा मार्ग पत्करला आहे, असे कळते. * मनसेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण यांची एक वर्षापूर्वीच गटनेतेपदावरून हकालपी झाली होती. त्यांचे गॉडफादर हे पक्षप्रमुख राज ठाकरे हेच मानले जात होते. परंतु, त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपी झाली. डावखरेंपासून दुरावले*हणमंत जगदाळे हे पूर्वी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचे कर समर्थक मानले जात होते. परंतु, २०१२ नंतर झालेल्या राजकीय घडामोडींमुळे त्यांनीदेखील त्यांची साथ सोडून नजीब मुल्लांच्या हातात हात मिळविला. त्यामुळे ते डावखरे यांच्यापासून दुरावले आहेत. ----नजीब मुल्ला आव्हाडांचे समर्थक * राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नजीब मुल्ला हे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कर समर्थक मानले जातात. त्यांच्या कृपेमुळेच त्यांना शहराध्यक्षपद मिळाले होते. त्यानंतर, त्यांनी आता शहर कार्यकारिणीही जाहीर करण्याची तयारी सुरू केली होती. या कार्यकारिणीतही आव्हाड गटाचा वरचष्मा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, आता परमार प्रकरणामुळे कार्यकारिणीची घोषणा लांबणीवर पडली आहे.चव्हाणांचाही तोच गॉडफादर* काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांना माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यामुळेच गटनेतेपद मिळाले होते. परंतु, पक्षाच्या विरोधात जाऊन त्यांनी काही कृत्ये केल्याने त्यांची या पदावरून हकालपी झाली होती. ते काँग्रेसचे नगरसेवक असले तरीसुद्धा वर्षभरापूर्वी झालेल्या या कारवाईनंतर ते राष्ट्रवादीच्या गोतावळ्यात अधिक आहेत. किंबहुना, मुल्ला यांच्या संपर्कात अधिक असल्याचेच समजते. आता काँग्रेसनेही हात वर केल्याने चव्हाणांनीदेखील अन्य तीन नगरसेवकांचे अनुकरण करीत त्याच गॉडफादरची कास धरली आहे.