बहिणीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने त्यांनी निवडला चोरीचा मार्ग
By admin | Published: July 13, 2017 07:53 AM2017-07-13T07:53:20+5:302017-07-13T07:54:47+5:30
बहिणीच्या लग्नात पैशांची कमतरता भासू नये यासाठी दोन तरुणांनी एटीम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - बहिणीच्या लग्नात पैशांची कमतरता भासू नये यासाठी दोन तरुणांनी एटीम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस पोहोचल्याने त्यांचा प्लान फसला आणि पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली आहे. दिल्लीमधील सुभाष प्लेस परिसरातील ही घटना आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक हातोडा जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणांचा रेकॉर्ड चेक असता त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती मिळाली आहे.
आणखी वाचा
आरोपींची ओळख पटली असून आबिद (21) आणि साजिद (20) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही शकूरपुर येथे भाड्याच्या घऱात राहतात. दोघेही कारपेंटरचं काम करतात. मंगळवारी रात्री पोलिसांनी एका व्यक्तीने फोन करुन सुभाष प्लेस परिसरातील सेंट्रल बँकेच्या एटीएममध्ये काही संशयित लोक घुसले असल्याची माहिती दिली. तसंच आतमध्ये घुसून ते एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचंही सांगितलं.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपींना रंगेहाथ पकडलं. पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता एका महिन्यानंतर आपल्या बहिणीचं लग्न पार पडणार आहे. लग्नासाठई पैशांची कमतरता भासू नये यासाठीच चोरी केल्याचं आरोपी तरुणांनी सांगितलं आहे. चोरीची हा प्लान आबिदने रचला होता, आणि साजिदने साथ दिली होती. पोलिसांनी दोन्ही आरोपी तरुणांना अटक केली असून तपास करत आहेत.