त्यांना देशात अराजक निर्माण करायचे होते; संसद घुसखोरीप्रकरणी पोलिसांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 05:39 AM2023-12-16T05:39:22+5:302023-12-16T05:39:32+5:30
संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ललित झा याला दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
नवी दिल्ली :संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ललित झा याला दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तो या घटनेचा मुख्य सूत्रधार असून त्यांना देशात अराजक निर्माण करायचे होते, असे त्याने कबूल केल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.
संपूर्ण कटाचा उलगडा करण्यासाठी त्यांची चौकशी करणे आवश्यक असल्याचे सांगून पाेलिसांनी १५ दिवसांच्या काेठडीची मागणी विशेष न्यायाधीश हरदीप कौर यांच्याकडे केल्यानंतर झा यास ७ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. झा याने कबूल केले की, त्यांना देशात अराजक निर्माण करायचे होते, जेणेकरून ते सरकारला त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास भाग पाडू शकतील. संपूर्ण कट आणि त्याची कार्यपद्धती उघड करायची आहे, असे पोलिसांनी सांगितले.