स्वत:ऐवजी क्रिकेटचा विचार करा - सुप्रीम कोर्ट

By admin | Published: November 25, 2014 02:32 AM2014-11-25T02:32:10+5:302014-11-25T02:32:10+5:30

ज्याला क्रिकेटच्या अर्थकारणात अजिबात रस नाही अशा भारतातील सर्वसामान्य नागरिकाची या खेळावर धर्माएवढीच श्रद्धा आहे.

Think of cricket instead of yourself - Supreme Court | स्वत:ऐवजी क्रिकेटचा विचार करा - सुप्रीम कोर्ट

स्वत:ऐवजी क्रिकेटचा विचार करा - सुप्रीम कोर्ट

Next
o्रीनिवासन यांना धरले धारेवर : संघ विकत कसा घेऊ शकता? 
नवी दिल्ली :  ज्याला क्रिकेटच्या अर्थकारणात अजिबात रस नाही अशा भारतातील सर्वसामान्य नागरिकाची या खेळावर धर्माएवढीच श्रद्धा आहे. त्यामुळे आपल्या हाती पुन्हा सूत्रे कशी येतील याची फिकीर करण्याऐवजी ‘जंटलमेन गेम’ असलेले क्रिकेट निकोपपणो टिकून कसे राहील याचा तुम्ही प्रथम विचार करा, असे खडेबोल सुनावून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) निलंबित अध्यक्ष एन. o्रीनिवासन यांना चांगलेच धारेवर धरले.
आयपीएल स्पर्धेतील स्पॉट फिक्सिंग व बेटिंग घोटाळ्याच्या संदर्भात मुद्गल समितीने सादर केलेल्या अहवालावर न्यायालयात युक्तिवाद झाला. या समितीने  ‘क्लीन चिट’ दिली असल्याने आपल्याला बीसीसीआय अध्यक्षपदाची धुरा पुन्हा वाहण्यास मुभा द्यावी, अशी विनंती श्रीनिवासन यांनी केली आहे. त्या संदर्भात द्विसदस्यीय खंडपीठाने श्रीनिवासन यांना असे खडसावले की, तुम्ही बीसीसीआय आणि आयपीएल यांच्यात फरक करू शकत नाही. आयपीएल हे बीसीसीआयचाच भाग आहे. त्यामुळे व्यक्तिगत हितसंबंध आणि मंडळाचे अध्यक्ष या नात्याने असलेली जबाबदारी यांच्यातील संघर्षाच्या मुद्दय़ाचे (कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट) उत्तर तुम्हाला द्यावेच लागेल.
 
तुम्ही खेळाचा गळा घोटत आहात..
क्रिकेट हा जंटलमन गेम म्हणून ओळखला जावा आणि तो योग्य खेळाडू वृत्तीने खेळला जावा. तुम्ही फिक्सिंगला मान्यता देत असाल, तर या खेळाचा गळा तुम्ही घोटत आहात, असे  सांगत न्यायालयाने बीसीसीआयलाही फटकारले.
 
च्क्रिकेट खेळ भावनेने खेळायला हवा आणि तो एक जंटलमेन गेमच असावा
च्फिक्सिंगला मान्यता देऊन तुम्ही त्या खेळाची हत्या करीत आहात
च्संशयाचा फायदा हा व्यक्तीपेक्षा खेळाला होऊ द्या
 
आयपीएल संघ विकत घेण्यामागे o्रीनिवासन यांचे हितसंबंध गुंतले आहेत. बीसीसीआयच्या अध्यक्षांना हा खेळ सुरू ठेवायचा होता, परंतु त्यांच्याच संघावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. ते त्यापासून पळू शकत नाहीत. - सुप्रीम कोर्ट

 

Web Title: Think of cricket instead of yourself - Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.