खुबचंद विद्यालयात चिंतन व मातृदिन

By admin | Published: February 23, 2016 12:03 AM2016-02-23T00:03:28+5:302016-02-23T00:03:28+5:30

खुबचंद विद्यालयात चिंतन व मातृदिन

Thinking at Khubchand School and Mother's Day | खुबचंद विद्यालयात चिंतन व मातृदिन

खुबचंद विद्यालयात चिंतन व मातृदिन

Next
बचंद विद्यालयात चिंतन व मातृदिन
जळगाव-खुबचंद सागरमल विद्यालयात चिंतन दिन व मातृदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.व्ही.साळुंखे होते. यावेळी साक्षी चौधरी, नयना पगारे, भारती काकडे, भाग्यश्री डोळे, मेघना सोनार, मोनिका चव्हाण, विशाखा बाविस्कर, रितू अहिरे, दिव्या बाविस्कर, शीतल मोरे, शीतल लोखंडे, शुभांगी सरदार, रोजमीन शेख, समरीनबी शेख उपस्थित होते.गोहिल यांनी मातृदिनाची तर मोनिका चव्हाण यांनी गाईड चळवळीची माहिती दिली.

बारी समाज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन
जळगाव- सूर्यवंशी बारी समाजातील सामूहिक विवाह सोहळ्याचे १ मे रोजी आयोजन करण्यात येत आहे.वधु वरांनी तसेच पालकांनी १२ एप्रिलपर्यंत गिरीश वराडे, न्यू.बी.जे. मार्केट, कैलास न्यूज पेपर, शिरसोली, बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, शिरसोली प्र.बो. यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन कैलास जे.बारी यांनी केले आहे.

रिपाइंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
सोबत फोटो-४०
जळगाव- रावेर व विवरे बुद्रुक येथील अतिक्रमण काढावे तसेच बोदवड तहसीलदार यांना निलंबित करावे या मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. उपोषणाचे नेतृत्त्व जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, मनोहर सुरडकर, विवेक तायडे, नागसेन सुरळकर, अशोक बोरकर, संजय तायडे, राजू इंगळे, सुकलाल पवार, प्रमोद चौधरी यांनी केले. यावेळी विवरे बुद्रुक येथील अतिक्रमण काढून इंदिरा आवास योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची मागणी करण्यात आली. तसेच शासनाचा महसूल बुडविणार्‍या बोदवड तहसीलदार व संबधित तलाठी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.

Web Title: Thinking at Khubchand School and Mother's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.