केजरीवालांना 'धक्के पे धक्का', 24 तासांत तिसरा झटका! आता आठवडाभर पाहावी लागमार वाट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 04:55 PM2024-04-10T16:55:49+5:302024-04-10T16:56:28+5:30
दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी केजरीवाल यांची अटक आणि कोठडी कायदेशीर ठरवत त्यांची याचिका फेटाळली होती. तर बुधवारी सकाळी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांची वकिलांशी संबंधित दुसरी याचिकाही फेटाळली. यात केजरीवाल यांनी आठवड्यातून 5 वेळा वकिलांना भेटण्याची परवानगी मागीतली होती.
दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकलेल्या अरविंद केजरीवाल यांना 'धक्के पे धक्के' बसत आहेत. गेल्या केवळ 24 तासांतच त्यांना तीन मोठे झटके बसले आहेत. अटक आणि कोठडीला आव्हान दिलेल्या प्रकरणात मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाकडून, तर बुधवारी वकिलांशी संबंधित एका मागणीसंदर्भातील याचिकेवर राऊस ॲव्हेन्यू कोर्टाकडून त्यांच्या हाती केवळ निराशा आली.
याशिवाय तिसरा झटका म्हणजे, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या अर्जावर लगेच सुनावणी होणार नसल्याची बातमी आली आहे. त्यांना पुढील आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयात विशेष खंडपीठ तयार केले जाणार नाही. अशा स्थितीत सोमवारपूर्वी सुनावणी होण्याची शक्यता नाही.
दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी केजरीवाल यांची अटक आणि कोठडी कायदेशीर ठरवत त्यांची याचिका फेटाळली होती. तर बुधवारी सकाळी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांची वकिलांशी संबंधित दुसरी याचिकाही फेटाळली. यात केजरीवाल यांनी आठवड्यातून 5 वेळा वकिलांना भेटण्याची परवानगी मागीतली होती. सध्या त्यांना आपल्या वकिलांना आठवड्यातून केवळ दोन वेळाच भेटता येते.
'...म्हणून सोमवारपर्यंत बघावी लागेल वाट' -
केजरीवाल यांनी बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र त्यांना सुनावणीसाठी पुढील आठवड्यापर्यंत वाट बघावी लागणार असल्याचे दिसते. सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर तातडीने सुनावणी होणार नाही. खरे तर, गुरुवारी ईद, शुक्रवारी स्थानिक सुट्टी आणि त्यानंतर शनिवार-रविवारची सुटी आहे. अशा परिस्थितीत सध्या सर्वोच्च न्यायालयात विशेष खंडपीठ स्थापन होणार नाही किंवा सोमवारपूर्वी सुनावणी होण्याचीही शक्यता नाही.