बिहारमध्ये आठवड्यात तिसरा पूल कोसळला; २ कोटी खर्चून बांधकाम सुरू होतं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 01:25 PM2024-06-23T13:25:43+5:302024-06-23T13:53:01+5:30

बिहारमध्ये पूल कोसळण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. आठवड्यात आता तीन पूल कोसळले आहेत.

Third bridge collapses in week in Bihar Construction starts at a cost of 2 crores | बिहारमध्ये आठवड्यात तिसरा पूल कोसळला; २ कोटी खर्चून बांधकाम सुरू होतं

बिहारमध्ये आठवड्यात तिसरा पूल कोसळला; २ कोटी खर्चून बांधकाम सुरू होतं

बिहारमधून आणखी एक पूल कोसळण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आठवडाभरात येथील पूल कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. आता बिहार येथील मोतिहारीमध्ये येथे ही घटना घडली आहे. याआधी अररिया आणि सिवानमध्येही पूल कोसळले आहेत. हा बांधकामाधीन प्रकल्प होता, याची अंदाजे किंमत सुमारे २ कोटी रुपये होती.

पतीने पाय दाबून दिले नाहीत; पत्नीने घेतला गळफास, तो झोपल्याने ती चिडली

मिळालेल्या माहितीनुसार, काल पूर्व चंपारणच्या मोतिहारीच्या घोरासहन ब्लॉकमधील चैनपूर स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर पूल कोसळल्याची घटना घडली. येथे दोन कोटी रुपये खर्चून पूल बांधण्यात येत होता. पुलाच्या कास्टिंगचे काम झाले होते. या पुलाची लांबी अंदाजे ५० फूट होती.

बिहारच्या सिवानमध्ये कालही पूल कोसळल्याची घटना घडली होती. येथे महाराजगंज-दरोंडा विधानसभेच्या सीमेला जोडणाऱ्या पुलावर पत्त्यांसारखा ढीग साचला होता. पाऊस नसतानाही हा पूल कोसळला याची चर्चा सुरू आहे.  या वर्षी ना वादळ आले ना पाऊस, तरीही महाराजगंज परिसरातील पाटेधी-गरौलीला जोडणाऱ्या कालव्यावर बांधलेला पूल कोसळला.

कोणतीही जीवितहानी झालेली नाही

अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, दारुंडा आणि महाराजगंज ब्लॉकमधील गावांना जोडणाऱ्या कालव्यावर हा पूल बांधण्यात आला होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तो पूल खूप जुना होता. कालव्यातून पाणी सोडताना खांब कोसळले. लोकांना शक्य तितक्या कमी गैरसोयींचा सामना करावा लागेल याची खात्री करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

दारुंडा येथील बीडीओ सूर्य प्रताप सिंह यांनी सांगितले की, स्थानिक लोकांचा दावा आहे की, महाराजगंजचे तत्कालीन आमदार उमाशंकर सिंह यांच्या योगदानातून हा पूल १९९१ मध्ये बांधण्यात आला होता. महाराजगंज उपविभागीय दंडाधिकारी अनिल कुमार यांनी सांगितले की, २० फूट लांबीचा हा पूल आमदार निधीतून बांधण्यात आला आहे. तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

मंगळवारी अररियामध्ये सुमारे १८० मीटर लांबीचा नवीन बांधलेला पूल कोसळला होता. हा पूल अररियातील सिक्टी येथील बाकरा नदीवर बांधण्यात आला आहे. या पुलाचे उद्घाटन होणार होते, मात्र त्यापूर्वीच हा पूल कोसळला. सिक्टी ब्लॉकमध्ये असलेल्या बाकरा नदीवर १२ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.

Web Title: Third bridge collapses in week in Bihar Construction starts at a cost of 2 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Biharबिहार