भरगच्च कार्यक्रमांनी रंगणार तिसरे रसिकराज राज्यस्तरीय संमेलन
By admin | Published: January 30, 2016 12:17 AM2016-01-30T00:17:36+5:302016-01-30T00:17:36+5:30
- रसिकराज व कमला नेहरू महाविद्यालयाचे आयोजन : अध्यक्षस्थानी विश्वास पाटील
Next
- सिकराज व कमला नेहरू महाविद्यालयाचे आयोजन : अध्यक्षस्थानी विश्वास पाटील नागपूर : रसिकराज सांस्कृतिक संस्थेच्यावतीने तिसरे राज्यस्तरीय रसिकराज मराठी साहित्य संमेलन १९ व २० मार्च रोजी कमला नेहरू महाविद्यालयाच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या सक्करदरा परिसरात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष अमर सेवा मंडळाचे सचिव ॲड. अभिजित वंजारी आहेत. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी लोकप्रिय कादंबरीकार विश्वास पाटील राहणार असून उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल. उद्घाटनाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील, महापौर प्रवीण दटके, कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, प्रा. सुरेश द्वादशीवार, गीतकार प्रवीण दवणे, गुरू ठाकूर, विसुभाऊ बापट, डॉ. विठ्ठल वाघ, डॉ. वि. स. जोग, सुधीर गाडगीळ, डॉ. रवींद्र शोभणे, शुभांगी भडभडे, मेजर हेमंत जकाते, डॉ. रामचंद्र देखणे उपस्थित राहतील. या साहित्य संमेलनात ११ सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यात विश्वास पाटील यांची मुलाखत, कथाकथन, निमंत्रितांचे कविसंमेलन, अभिरूप न्यायालय, मराठी गीतांचा कार्यक्रम, मकरंद अनासपुरे यांची मुलाखत आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी अक्षरलेणी या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल. बाहेरगावाहून येणाऱ्या रसिकांची निवास व्यवस्था नाममात्र शुल्कात करण्यात येईल. यासंदर्भात महाविद्यालयात संपर्क साधता येईल. यासंदर्भात अधिक माहितीसाठी रसिकराजचे बळवंत भोयर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.