२५ वाळूगटांसाठी तिसर्यांदा निविदा प्रक्रिया पर्यावरणची परवानगी प्राप्त : ठेकेदारांना लिलावाची रक्कम भरण्यासाठी पत्रव्यवहार
By admin | Published: January 13, 2016 10:48 PM2016-01-13T22:48:53+5:302016-01-13T22:48:53+5:30
जळगाव : जिल्ातील गिरणासह अन्य नदीपात्रातील वाळू गटांच्या लिलावाची तिसर्यांदा ऑन लाईन प्रक्रिया करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. दरम्यान, संपूर्ण ४४ वाळू गटांना पर्यावरण विभागाची परवानगी प्राप्त झाली आहे. त्यानुसार लिलाव झालेल्या वाळू गटांचे पैसे भरण्यासाठी प्रशासनाने ठेकेदारांना पत्र दिले आहेत.
Next
ज गाव : जिल्ातील गिरणासह अन्य नदीपात्रातील वाळू गटांच्या लिलावाची तिसर्यांदा ऑन लाईन प्रक्रिया करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. दरम्यान, संपूर्ण ४४ वाळू गटांना पर्यावरण विभागाची परवानगी प्राप्त झाली आहे. त्यानुसार लिलाव झालेल्या वाळू गटांचे पैसे भरण्यासाठी प्रशासनाने ठेकेदारांना पत्र दिले आहेत.तिसर्यांदा निविदा प्रक्रियेच्या हालचालीजिल्हा प्रशासनाने यापूर्वी ४४ वाळू गटांची ऑन लाईन लिलावाची प्रक्रिया राबविली होती. त्यापैकी १६ वाळू गटांचा लिलाव होऊन १६ कोटींच्या जवळपास निधी शासनाला मिळाला. या दरम्यान २८ गटांना ऑन लाईन निविदा प्रक्रियेत प्रतिसाद मिळाला नसल्याने जिल्हा प्रशासनाने दुसर्यांदा निविदा प्रक्रिया राबविली. त्यात भडगाव तालुक्यातील सावदे व जळगाव तालुक्यातील जामोद या दोनच गटांना प्रतिसाद मिळाला आहे. सावदे वाळू गटासाठी ६६ लाख ८८ हजार तर जामोद वाळू गटांसाठी ३५ लाख ५२ हजारांचा लिलाव झाला. प्रतिसाद न मिळालेल्या २५ वाळू गटांसाठी पुन्हा लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. पर्यावरण विभागाची परवानगी प्राप्तजिल्हा प्रशासनातर्फे ४४ वाळू गटांसाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र या गटांना पर्यावरण विभागाची परवानगी मिळालेली नव्हती. मंगळवारी पर्यावरण विभागाच्या परवानगीचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने वाळू ठेकेदारांना वाळू गटाची रक्कम भरण्याबाबतचे पत्र दिले आहे. या परवानगीत नव्या अटी टाकण्यात आहेत.चौकटया वाळू गटांसाठी होणार नव्याने निविदा प्रक्रियाअमळनेर तालुका- मांडळ भाग १, मांडळ भाग-२, मुडी प्र.डां., बोदर्डे. चोपडा तालुका- तांदलवाडी भाग-२, खाचणे. मुक्ताईनगर तालुका- पातोंडी, भोकरी. एरंडोल तालुका- उत्राण गु.ह. भाग- ४. धरणगाव तालुका - बांभोरी प्र.चा. भाग-१, चांदसर बु., चोरगाव, रेल, बाभुळगाव.पाचोरा तालुका- दुसखेडा, परधाडे, कुरंगी भाग-१. भडगाव तालुका- पिंपळगाव बु., कराब-वडघे, वडजी भाग २, टोणगाव , पांढरद, पिचर्डे, दलवाडे, कोठली या गटांचा समावेश आहे.