तिसरे महायुद्ध गायीवरुन सुरु होईल

By admin | Published: August 8, 2016 01:37 PM2016-08-08T13:37:29+5:302016-08-08T13:49:24+5:30

तिसरे जागतिक महायुद्ध गायीवरुन सुरु होईल असा दावा महामंडलेश्वर स्वामी अखिलेश्वरानंद यांनी केला आहे.

The third world war will start from cows | तिसरे महायुद्ध गायीवरुन सुरु होईल

तिसरे महायुद्ध गायीवरुन सुरु होईल

Next

ऑनलाइन लोकमत 

इंदूर, दि. ८ - तिसरे जागतिक महायुद्ध गायीवरुन सुरु होईल असा दावा महामंडलेश्वर स्वामी अखिलेश्वरानंद गिरी यांनी केला आहे. ते मध्यप्रदेशच्या गौपालन एवम पूश संवर्धन मंडळाचे अध्यक्ष आहेत. गायींचे संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. 
 
गाय हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिली आहे. तुम्ही पुराणात पाहिले तर, १८५७ साली स्वातंत्र्याची पहिली लढाई गायीवरुन झाली होती असे स्वामी अखिलेश्वरानंद यांनी सांगितले. भगवी वस्त्र, कपाळाला अष्टगंधचा लेप, गळयात रुद्राक्षाची माळ या पेहरावामुळे स्वामी अखिलेश्वरानंद लगेच समोरच्याचे लक्ष वेधून घेतात. 
 
सरकारी कार्यालयात बसलेल्या स्वामी अखिलेश्वरानंद यांची भेट घ्यायाला येणारे पाहुणे पायापडून त्यांचा आर्शिवाद घेतात. ६१ वर्षीय स्वामींना मार्च २०१० मध्ये निरंजन अखाडयाची महामंडलेश्वर ही पदवी मिळाली. सन्यासी जीवन स्वीकारल्यानंतर १२ वर्षांनी त्यांना ही पदवी मिळाली.  
 
गाय हा गौरक्षकांसाठी भावनिक विषय आहे. त्यामुळे मृत किंवा जखमी गाय पाहिल्यानंतर गौरक्षकांना राग येणे स्वाभाविक आहे. गौरक्षकांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहनही स्वामी अखिलेश्वरानंद करतात. गायींची तस्करी करणारी गाडी पकडल्यानंतर पोलिस येईपर्यंत गौरक्षकांनी वाट पहावी. 
 
कायदा आपल्या हातात घेऊ नये असे त्यांचे म्हणणे आहे. सर्व राज्यांनी गायीच्या कत्तलीविरोधात कठोर कायदा बनवला आहे. त्यामुळे राज्यांच्या सीमांवरुन पशू तस्करी अशक्य बनली आहे असे स्वामी अखिलेश्वरानंद यांनी सांगितले. 
 
दीक्षा घेण्यापूर्वी स्वामी अखिलेश्वरानंद विहिपच्या रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी होते. गायीचे दूध, मूत्र आणि शेणामध्ये वैद्यकीय गुण असण्यावर त्यांचा विश्वास आहे. 
 

Web Title: The third world war will start from cows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.