चहावाल्याचा मुलींच्या लग्नात दीड कोटींचा हुंडा

By Admin | Published: April 13, 2017 10:34 AM2017-04-13T10:34:08+5:302017-04-13T10:49:53+5:30

एका चहावाल्याने आपल्या सहा मुलींच्या लग्नात तब्बल दीड कोटींचा हुंडा दिल्याने आयकर विभागाच्या रडारवर आला आहे

Thirteenth Dowry | चहावाल्याचा मुलींच्या लग्नात दीड कोटींचा हुंडा

चहावाल्याचा मुलींच्या लग्नात दीड कोटींचा हुंडा

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 13  एका चहावाल्याने आपल्या सहा मुलींच्या लग्नात तब्बल दीड कोटींचा हुंडा दिल्याने आयकर विभागाच्या रडारवर आला आहे. चहावाल्याने आपल्या सहा मुलींच्या लग्नात हुंडा देताना एवढी मोठी रक्कम दिल्याने तो चर्चेत आला होता. 4 एप्रिल रोजी हा विवाहसोहळा पार पडला होता. या विवाहसोहळ्यातील व्हिडीओ गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये चहावाला लिलाराम गुर्जर उपस्थित लोकांच्या मध्ये उभे राहून पैसे उडवत असताना आणि मोजताना दिसत आहे. यानंतर एक नोटांचा बंडल मुलाच्या कुटुंबियांना देत असल्याचंही दिसत आहे. 
 
लिलाराम गुर्जर यांचं कोटपूतलीजवळ हडोता येथे चहाचं दुकान आहे. मंगळवारी आयकर विभागाने लिलाराम यांना नोटीस पाठवत आपलं उत्पन्न जाहीर करण्यास सांगितलं होतं. तसंच हा सर्व पैसा कोणत्या मार्गाने आला यासंबंधीही माहिती मागवली. मात्र लिलाराम गुर्जर यांनी नोटीशीचं उत्तर दिलेलं नाही. 
 
"आम्ही गुरुवारपर्यंत वाट पाहणार आहोत. त्यांच्याकडे संपत्तीची संपुर्ण माहिती मागितली आहे. त्यांनी आयकर परतावा भरला आहे की नाही याचीही माहिती घेण्यात येईल. हुंड्यात दिलेली रक्कम त्यांच्या जाहीर न केलेल्या संपत्तीचा भाग असल्यास कारवाईला सुरुवात करण्यात येईल. आपल्या संपत्तीशी संबंधित सर्व कागदपत्र आणण्याचा आदेश त्यांना दिला आहे", अशी माहिती एका आयकर अधिका-याने दिली आहे.
 
आपल्या संपत्तीचा देखावा करण्याच्या नादात अडकलेले लिलाराम गुर्जर यांची अडचण फक्त आयकर विभागानेच वाढवलेली नाही. आपल्या ज्या मुलींचं त्यांनी लग्न लावून दिलं त्यामधील चौघी अल्पवयीने असल्याचा आरोप आहे. गुर्जर यांनी लग्नपत्रिकेवर फक्त आपल्या दोन मुलींचंच छापलं होतं, मात्र 4 एप्रिल रोजी इतर चार अल्पवयीन मुलींचंही त्यांनी लग्न लावून दिलं होतं. 
 
पोलीस सध्या लिलाराम गुर्जर आणि त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेत आहे. "आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो, पण सर्वजण बेपत्ता आहेत. त्यांच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचा आदेश दिला आहे" अशी माहिती पोलीस अधिका-याने दिली आहे.
 

Web Title: Thirteenth Dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.