तिरुमल्ला तिरुपतीकडे ५.५ टन सोने!
By admin | Published: August 9, 2015 04:04 AM2015-08-09T04:04:40+5:302015-08-09T04:13:30+5:30
आंध्र प्रदेशातील तिरुमल्ला तिरुपती देवस्थानम्च्या बँक खात्यात ४ हजार ५०० किलो सोने जमा असून, त्यावरील व्याजापोटी देवस्थानला दरवर्षी ८० किलो सोने मिळते, अशी माहिती समोर आली आहे.
हैदराबाद : आंध्र प्रदेशातील तिरुमल्ला तिरुपती देवस्थानम्च्या बँक खात्यात ४ हजार ५०० किलो सोने जमा असून, त्यावरील व्याजापोटी देवस्थानला दरवर्षी ८० किलो सोने मिळते, अशी माहिती समोर आली आहे. बँकेच्या खात्यात आणखी एक टन सोने जमा करण्याची तयारी व्यवस्थापनाने केली असून, या ५ हजार ५०० किलो सोन्याची किंमत १ हजार ३२० कोटी रुपये आहे.
तिरुवअनंतपुरम्मधील पद्मनाभस्वामी मंदिराने तिरुपतीला मागे टाकले असले तरी तिरुमल्ला देवस्थानची संपत्तीही वेगाने वाढते आहे. देवस्थानने जाहीर केलेल्या संपत्तीनुसार सद्य:स्थितीत त्यांच्याजवळ ४.५ टन सोने आहे. हे सोने स्टेट बँक आॅफ इंडिया, ओव्हरसीज बँक आणि कॉर्पोरेशन बँकेतील खात्यात जमा आहे. देवस्थानकडे अजून एक हजार
किलो सोने जमा झाल्याचे तिरुमल्ला देवस्थानचे कार्यकारी अधिकारी डी. संबाशिव राव यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)