"...यामुळे चलनाच्या अखंडतेवर, स्थिरतेवर शंका निर्माण;" २ हजारांच्या नोटेवरून चिदम्बरम यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 05:57 AM2023-05-30T05:57:54+5:302023-05-30T05:58:34+5:30

दोन हजार रुपयांच्या नोटा सामान्य जनतेच्या गरजेच्या नव्हत्या, चिदम्बरम यांचं वक्तव्य.

this casts doubt on the integrity stability of the currency p Chidambaram s criticism on 2000 note | "...यामुळे चलनाच्या अखंडतेवर, स्थिरतेवर शंका निर्माण;" २ हजारांच्या नोटेवरून चिदम्बरम यांची टीका

"...यामुळे चलनाच्या अखंडतेवर, स्थिरतेवर शंका निर्माण;" २ हजारांच्या नोटेवरून चिदम्बरम यांची टीका

googlenewsNext

दोन हजार रुपयांच्या नोटा सामान्य जनतेच्या गरजेच्या नव्हत्या. दोन हजाराची नोट चलनात आणणे आणि परत घेण्याच्या भयंकर तमाशाने भारताच्या चलनाच्या अखंडतेवर आणि स्थिरतेवर शंका निर्माण केली आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली आहे.

सध्याची परिस्थिती २००४ ते २००९ मधील तेजीच्या वर्षांच्या ९ टक्के वाढीच्या सरासरीपेक्षा खूप दूर असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारांच्या कार्यकारी अधिकारांमध्ये कपात करण्यात आली असून, बिगरभाजपशासित राज्यांचे राज्यपाल व्हाइसरॉयसारखे वागत आहेत. राज्य सरकारांना अस्थिर करण्यासाठी केंद्रीय  तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

Web Title: this casts doubt on the integrity stability of the currency p Chidambaram s criticism on 2000 note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.