"ही आदिवासी आणि गैरआदिवासीची नव्हे, तर दोन विचारधारांची लढाई" - यशवंत सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 06:10 AM2022-06-24T06:10:25+5:302022-06-24T06:11:56+5:30

Yashwant Sinha : ‘लोकमत’बरोबर विशेष बातचीत करताना यशवंत सिन्हा म्हणाले की, द्रौपदी मुर्मू यांच्याशी असलेली लढत आदिवासी व गैर आदिवासी अशी न पाहता ही संविधान बचावाची लढाई आहे.

"This is not a battle of tribals and non-tribals, but a battle of two ideologies" - Yashwant Sinha | "ही आदिवासी आणि गैरआदिवासीची नव्हे, तर दोन विचारधारांची लढाई" - यशवंत सिन्हा

"ही आदिवासी आणि गैरआदिवासीची नव्हे, तर दोन विचारधारांची लढाई" - यशवंत सिन्हा

googlenewsNext

- शरद गुप्ता
 नवी दिल्ली : संख्याबळ भलेही कमी असले तरी, राष्ट्रपती पदाचे विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांचे म्हणणे आहे की, विजय त्यांचाच होणार आहे. ‘लोकमत’बरोबर विशेष बातचीत करताना ते म्हणाले की, द्रौपदी मुर्मू यांच्याशी असलेली लढत आदिवासी व गैर आदिवासी अशी न पाहता ही संविधान बचावाची लढाई आहे.

स्वत: आदिवासीबहुल राज्य झारखंडमधून आलेले यशवंत सिन्हा एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतिपदाच्या रूपात पाहू इच्छित नाहीत का, असे विचारले असता, ते म्हणतात की, कोणी कोणत्या कुळात जन्म घ्यावा, हे त्याच्या हातात असते का? परंतु मुर्मू तर ओडिशाच्या मंत्री राहिलेल्या आहेत. त्या झारखंडच्या राज्यपालही राहिलेल्या आहेत. त्यांनी आदिवासींसाठी आजवर काय काम केले, हे त्यांना विचारा.तीन ज्येष्ठ नेत्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. असे असताना आपण कसे काय तयार झालात, असे विचारले असता, सिन्हा म्हणाले की, मी मैदान सोडणाऱ्यांपैकी नाही. ही लहान-सहान लढाई नाही. 

पुन्हा एकदा अंतरात्म्याची भूमिका
राष्ट्रपती निवडणुकीत आमदार व खासदारांना कोणाला मत द्यायचे, यासाठी व्हीप जारी केले जात नाहीत. राज्यसभेप्रमाणे त्यांना आपले मत पक्षाच्या एजंटलाही दाखवावे लागत नाही. त्यामुळे यशवंत सिन्हा यांच्याकडे संख्याबळ नसले तरी, खासदार व आमदारांच्या अंतरात्म्याच्या आवाजाकडून अपेक्षा आहेत. १९६९ च्या निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या खासदारांना व आमदारांना अंतरात्म्याचा आवाज ऐकून मते देण्याचे आवाहन केले होते आणि त्यावेळी अपक्ष उमेदवार व्ही. व्ही. गिरी हे काँग्रेसचे उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांच्याविरुद्ध जिंकले हाेते.

राष्ट्रपती निवडणूक : एनडीएच्या उमेदवार द्राैपदी मुर्मू दिल्लीत दाखल
राष्ट्रीय लाेकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्राैपदी मुर्मू या दिल्लीत दाखल झाल्या असून, त्या आज, शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दिल्लीत पाेहाेचल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भेट घेतली. 
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जाेशी यांच्या निवासस्थानी मुर्मू यांच्या उमेदवारी अर्जासंबंधी कागदपत्रे तयार करण्यात येत आहेत. मुर्मू यांच्या उमेदवारी अर्जाला पंतप्रधान माेदी यांच्यासह ज्येष्ठ केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे अनुमाेदक राहतील. मुर्मू यांनी दिल्लीला रवाना हाेण्यापूर्वी एका निवेदनाद्वारे सर्वांना सहकार्याची विनंती केली हाेती. 
बीजू जनता दलानेही मुर्मू यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. मात्र, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे परदेश दाैऱ्यावर असल्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी ते उपस्थित राहू शकणार नाही. त्यामुळे जगन्नाथ सारका आणि टुकूनी साहू यांना मुर्मू यांच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी करण्याची सूचना पटनायक यांनी केली आहे. 
पंतप्रधानांनी केले ट्विट
द्राैपदी मुर्मू यांना भेटल्यानंतर पंतप्रधान माेदी यांनी ट्विट करून माहिती दिली. त्यांच्या उमेदवारीला देशभरातील विविध स्तरातून समर्थन मिळत आहे. तळागाळातील समस्यांप्रती मुर्मू यांना अधिक जाण  असल्याचे माेदी यांनी सांगितले.

Web Title: "This is not a battle of tribals and non-tribals, but a battle of two ideologies" - Yashwant Sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.