दिल्लीत २५ ऑक्टोबरपासून पेट्रोल, डिझेल खरेदी करण्यासाठी करावी लागणार ही प्रक्रिया, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 03:15 PM2022-10-01T15:15:21+5:302022-10-01T15:15:33+5:30
दिल्लीत प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता दिल्लीत २५ ऑक्टोबरपासून पेट्रोल, डिझेल खरेदी करण्यापूर्वी वाहणधारकांना अगोदर तुमच्या वाहणाची पीयुसी दाखवावी लागणार आहे.
नवी दिल्ली : दिल्लीत प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता दिल्लीत २५ ऑक्टोबरपासून पेट्रोल, डिझेल खरेदी करण्यापूर्वी वाहणधारकांना अगोदर तुमच्या वाहणाची पीयुसी दाखवावी लागणार आहे. जर तुमचे पीयुसी नसेल तर तुम्हाला पेट्रोल,डिझेल मिळणार नाही.या संदर्भात आप सरकार लवकरच अधिसूचना जारी करणार आहे.
दिल्ली सरकारची या संदर्भात २९ सप्टेंबर रोजी बैठक झाली. या बैठकीत पर्यावरणा संदर्भात चर्चा झाली. यावेळी ज्या वाहणधारकाकडे पर्यावरण नियंत्रण प्रमाणपण म्हणजेच पीयुसी नसेल त्यांना पेट्रोल,डिझेल मिळणार नाही हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाची अंबलबजावणी २५ ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणात वाहनांचा धुर हेच प्रमुख एक कारण आहे. हे सध्या कमी करणे अत्यावश्यक आहे, त्यामुळे २५ ऑक्टोबरपासून वाहनाच्या पीयूसी प्रमाणपत्राशिवाय पेट्रोल, डिझेल पेट्रोल पंपांवर उपलब्ध होणार नाही,असा निर्णय घेण्यात आला आहे. ६ ऑक्टोबरपासून प्रदुषणविरोधी मोहीम राबवण्यात येणार आहे.
पायलट विरुद्ध गेहलोत! पक्षश्रेष्टी कोणाची समजूत काढणार..? काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाचे वारे
राजधानी दिल्लीत गेल्या काही महिन्यापासून इंधनाच्या दरात वाढ झालेली नाही. मे महिन्याच्या अखेरीस उत्पादन शुल्क कमी केले होते.त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत घट झाली होती. आज दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये लिटर तर डिझेल ८९.६२ रुपये लिटर आहे.