दहशतवाद्यांचं हे होतं लक्ष्य, तीन होते विदेशी; पूँछमधील हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 04:59 PM2023-04-21T16:59:17+5:302023-04-21T17:14:14+5:30

गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पूंछदरम्यान जात असलेल्या लष्कराच्या ट्रकवर मुसळधार पाऊस सुरू असतानाच परिसरात अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार केला

This was the target of terrorists, three were foreigners; Important information about the attack in Poonch | दहशतवाद्यांचं हे होतं लक्ष्य, तीन होते विदेशी; पूँछमधील हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती समोर

दहशतवाद्यांचं हे होतं लक्ष्य, तीन होते विदेशी; पूँछमधील हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती समोर

googlenewsNext

श्रीनगर - अतिवृष्टी व कमी दृश्यमानतेचा फायदा घेत दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ भागात लष्करी वाहनावर हल्ला केला. त्यात ५ जवान शहीद झाले. या घटनेत आणखी एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याला राजौरी येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे. या घटनेला ५ दहशतवाद्यांनी घडवून आणले आहे. त्यामध्ये, तीन दहशतवादी विदेशी असून दोघेजण स्थानिक असल्याची माहिती आहे. जी २० परिषदेच्या बैठकीपूर्वी दहशत निर्माण करणे हाच या हल्ल्याचा उद्देश होता, अशीही माहिती आता समोर आली आहे. याप्रकरणी अनेकांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. 

गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पूंछदरम्यान जात असलेल्या लष्कराच्या ट्रकवर मुसळधार पाऊस सुरू असतानाच परिसरात अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी ट्रकवर बॉम्ब टाकल्यामुळे आग लागली असावी, असे उत्तरी कमांडच्या मुख्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. पाचही शहीद जवान राष्ट्रीय रायफल्सचे होते. घटना घडली ते ठिकाण पूंछपासून ९० किलोमीटर अंतरावर आहे. शहीद झालेले जवान राष्ट्रीय रायफल्स युनिटचे होते. हल्ला ज्या ठिकाणी झाला, तेथे गेल्या वर्षी दहशतवाद्यांसोबत मोठी चकमक झाली होती. या ठिकाणी आजूबाजूला घनदाट जंगल आहे.

दरम्यान, भारत जी २० परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे, त्यातूनच भारतातील विविध राज्यात जी २० परिषदेच्य बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यापैकी दोन बैठका ह्या काश्मीर खोऱ्यात होत आहेत. लेहमध्ये २६ ते २८ एप्रिल आणि श्रीनगरमध्ये २२ ते २४ मे रोजी ही बैठक होत आहे. या बैठकीपूर्व हल्ला करुन दहशतवादी संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणच्या बैठकांना पाकिस्तानने आपत्ती असल्याचंगही म्हटले आहे. मात्र, भारताने श्रीनगर आणि लेह-लदाख हे आपल्या भारताचाच अंग असल्याचे बजावले आहे.

 

Web Title: This was the target of terrorists, three were foreigners; Important information about the attack in Poonch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.