अटीतटीच्या जागा यंदा मात्र धोक्यात; तीन राज्यांत काँग्रेसने ७५, भाजपने ६५ टक्के जागा गमावल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 10:50 AM2023-10-26T10:50:52+5:302023-10-26T10:51:45+5:30
विजय आणि पराभव यातील मतांचा फरक पुढील निवडणुकीत त्या जागेचे भवितव्य दर्शवितो.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : विजय आणि पराभव यातील मतांचा फरक पुढील निवडणुकीत त्या जागेचे भवितव्य दर्शवितो. २००८ व २०१३ मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमधील जागांचे विश्लेषण केले असता ही बाब स्पष्टपणे दिसते. ३२१ जागी पुढील निवडणुकीत यापैकी १५९ जागांवर (सुमारे ६९%) विजयी झालेले पक्ष बदललेले दिसून आले.
तीन राज्यांत भाजपने ५००० पेक्षा कमी फरकाने जिंकलेल्या १४३ पैकी ९३ (६५ टक्के) जागा आणि काँग्रेसने ८८ पैकी ६६ (७५ टक्के) जागा पुढील निवडणुकीत गमावल्या आहेत.
मध्य प्रदेश : ३३ जागी चिंता
एकूण २३० जागांवर आपण दोन निवडणुकांचा कल विचारात घेतला तर २०१८ मध्ये १००० पेक्षा कमी मतांच्या फरकाने जिंकलेल्या १० पैकी ८ जागा आणि ५००० पेक्षा कमी मतांच्या फरकाने जिंकलेल्या ४५ पैकी ३३ जागा पक्षंना गमवाव्या लागू शकतात.
छत्तीसगड : १५ पैकी ११ जागांवर उलटफेर?
एकूण ९० जागांमध्ये २०१८ मध्ये, एक हजारपेक्षा कमी मतांच्या फरकाने फक्त दोन जागा होत्या. यापैकी एक भाजप आणि दुसरी रेसीसी (जे)ची होती. मात्र, ५ हजारांपेक्षा कमी मताधिक्याच्या १५ जागा होत्या. दोन निवडणुकांचा कल सांगतो की, यापैकी ११ जागा (७३टक्के) गमावल्या जाऊ शकतात.
तीन राज्यांत ६३% जागी बदल?
२०१८ मध्ये तीन राज्यांमध्ये ५ हजारांपेक्षा कमी मतांनी निकाल लागलेले ९९ मतदारसंघ होते, तर २१ जागी एक हजारापेक्षा कमी मतांनी जिंकले होते. हा निवडणूक निकालांचा कल लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकांत यापैकी ६३ टक्के जागा दुसऱ्या पक्षाला मिळू शकतात. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये २००८ आणि २०१३ च्या निवडणुकीत पक्षांनी ५ हजारपेक्षा कमी मतांच्या फरकाने जिंकलेल्या ६९ टक्के जागा विद्यमान पक्षाने गमावल्या, तर २०१८ मध्ये अशा ९९ जागा गमावल्या.
राजस्थान : ७२% जागा अडचणीत, किरकाेळ फरक ठरणार महत्त्वाचा
एकूण २०० जागा असलेल्या राज्यात २०१८ मध्ये भाजप-काँग्रेसकडे एक हजारापेक्षा कमी मतांच्या फरकाने विजय मिळवेल्या एकूण ९ जागा होत्या. दोन निवडणुकांची सरासरी पाहिल्यास, इतर पक्ष यापैकी ६ (७२%) जागा हिसकावून घेऊ शकतात. ५ हजारांपेक्षा कमी मतांच्या फरकाने ३१ जागांपैकी १६ जागा जिंकता येतील.