यंदा थंडीचा कडाका, पारा घसणार १७ अंशांपर्यंत; पावसामुळे नव्हे, ‘ला-नीना’मुळे थंडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 06:58 AM2022-10-30T06:58:10+5:302022-10-30T06:58:17+5:30

हवामान विभागाने सांगितले की, उत्तर भागातील डोंगरी भागात बर्फवृष्टीनंतर थंडीची लाट मध्य भारतापर्यंत पोहोचेल.

This year, the cold will be severe, the mercury will drop to 17 degrees | यंदा थंडीचा कडाका, पारा घसणार १७ अंशांपर्यंत; पावसामुळे नव्हे, ‘ला-नीना’मुळे थंडी 

यंदा थंडीचा कडाका, पारा घसणार १७ अंशांपर्यंत; पावसामुळे नव्हे, ‘ला-नीना’मुळे थंडी 

googlenewsNext

नवी दिल्ली : यावर्षी जोरदार पावसाने देशाच्या अनेक भागांत पाणी-पाणी केल्यानंतर यंदा कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाज आहे. पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानसह गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणामध्ये ६ ते ७ नोव्हेंबरदरम्यान तापमानात घट होईल. 

हवामान विभागाने सांगितले की, उत्तर भागातील डोंगरी भागात बर्फवृष्टीनंतर थंडीची लाट मध्य भारतापर्यंत पोहोचेल. त्यामुळे ६ नोव्हेंबरपासून थंडीमध्ये वाढ होईल. पुढील आठवड्यात गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशात रात्री थंडी जाणवेल; पण दुपारचे तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस राहील. मध्य भारतात काही ठिकाणी धुके पडेल. पुढील आठवड्यापासून देशाच्या अनेक भागांतील तापमानात घट होईल. 

पावसामुळे नव्हे, ‘ला-नीना’मुळे थंडी 

यंदा थंडी अधिक प्रमाणात असणार आहे; पण मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस हे त्याचे कारण नाही तर, ला-नीनामुळे थंडी वाढणार आहे. ला-नीना ही सागरी व वातावरणातील एक घटना आहे. ला-नीनाचा प्रभाव हिवाळ्यात जाणवणार आहे, तसेच ला-नीनाचा प्रभाव मार्च २०२३ पर्यंत राहणार आहे. त्यामुळे पुढील चार महिने कडाक्याची थंडी राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: This year, the cold will be severe, the mercury will drop to 17 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.