३०० नॉटिकल मैल परिसरात ‘त्या’ बेपत्ता विमानाचा शोध
By admin | Published: July 26, 2016 01:27 AM2016-07-26T01:27:07+5:302016-07-26T01:27:07+5:30
येथून पोर्ट ब्लेअरला जाताना बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या एएन-३२ विमानाचा ठावठिकाणा अद्याप लागत नसल्याने काळजीत भर पडत आहे.
चेन्नई : येथून पोर्ट ब्लेअरला जाताना बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या एन-३२ विमानाचा ठावठिकाणा अद्याप लागत नसल्याने काळजीत भर पडत आहे.
आम्हाला अद्याप त्या विमानाचा वा त्याच्या अवशेषांचा, त्या विमानात असलेल्या एकाचाही शोध लागलेला नाही, असे तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हवामानात सुधारणा झाल्याने
तपास कामाला गती देण्यात आली आहे. विमानाच्या शोधासाठी उपग्रहाची मदत घेण्यात येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
बेपत्ता विमानाचा चार दिवसांपासून शोध सुरू आहे. (वृत्तसंस्था)
- बंगालच्या खाडीत हवाई क्षेत्रात ३६० ते ३०० मिल भागात हा शोध सुरू आहे, तर समुद्रात १२० मिल लांब व रुंद भागात याचा शोध सुरू आहे. हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जर विमानाचे तुकडे झाले असतील तर त्याचे अवशेष सापडू शकतात; परंतु जर विमान थेट समुद्रात कोसळले असेल तर अशा घटनांत साधारणपणे तपासासाठी एक आठवड्याचा कालावधी लागू शकतो.
- समुद्रात ३५०० मीटर खोलीपर्यंत तपास केला जात आहे. शुक्रवारी सकाळी चेन्नईजवळच्या विमानतळावरून या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच या विमानाचा संपर्क तुटला होता. हवाई दलाच्या चालकांसह सहा जणांसह विमानात २९ जण होते. या विमानाचा शोध घेण्यासाठी १२ जहाजांची मदत घेतली जात आहे. हवाई दलाची विमानेतही तपासकार्यात सहभागी आहेत.
उपग्रहाच्या माध्यमातून शोध घेण्यासाठी आम्ही इस्रोची मदत मागितली आहे. उपग्रह चित्र काही वस्तंूूचे संकेत देत आहेत; पण या विमानाबाबत अद्याप ठोस माहिती मिळू शकली नाही. वातावरणात सुधारणा झाल्याने तपास कार्याला गती देण्यात येत आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.