'त्या' नोटांचा होणार रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी उपयोग
By admin | Published: November 13, 2016 08:39 PM2016-11-13T20:39:46+5:302016-11-13T20:39:46+5:30
बँकात जमा होणाऱ्या 500 आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटांचे काय केले जाणार असा प्रश्न सर्वांना पडलाय.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - नरेंद्र मोदी यांनी 500 आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यापासून देशभरातील नागरिकांची या नोटा बदलून घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. आता एवढ्या प्रमाणावर बँकात जमा होणाऱ्या जुन्या नोटांचे काय केले जाणार असा प्रश्न सर्वांना पडलाय. या चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटांची विल्हेवाट कशी करायची याची तयारी याआधीच झाली आहे. या नोटांचे बारीकबारीक तुकडे करून त्यांचा उपयोग रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी करण्यात येणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की या नोटांचे बारीक बारीक तुकडे करण्यात येतील. त्यानंतर त्यांचे विघटन घडवून त्याच्य विटा तयार करण्यात येतील, ज्याचा उपयोग रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी करता येईल. नई दुनिया या हिंदी वृत्तपत्राने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. प्राप्त आकडेवारीनुसार देशात 500 रुपयांच्या 15 हजार 707 दशलक्ष आणि एक हजार रुपयांच्या सहा हजार 326 दशलक्ष नोटा चलनात होत्या.