प्रियकराला पाठवले मैत्रिणींचे ‘ते’ फोटो, चंडीगडमधील प्रकरणाची पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 06:56 AM2022-09-28T06:56:05+5:302022-09-28T06:59:49+5:30

चंडीगड विद्यापीठातील मुलींचे खासगी व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणाची पुनरावृत्ती तामिळनाडूत झाली आहे.

Those photos of girlfriend sent to boyfriend repeat case in Chandigarh crime news 2 arrested | प्रियकराला पाठवले मैत्रिणींचे ‘ते’ फोटो, चंडीगडमधील प्रकरणाची पुनरावृत्ती

प्रियकराला पाठवले मैत्रिणींचे ‘ते’ फोटो, चंडीगडमधील प्रकरणाची पुनरावृत्ती

googlenewsNext

मदुराई : चंडीगड विद्यापीठातील मुलींचे खासगी व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणाची पुनरावृत्ती तामिळनाडूत झाली आहे. प्रेयसीसाेबत राहणाऱ्या मैत्रिणींची अश्लील व खासगी छायाचित्रे तसेच व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी प्रेयसी आणि एका डाॅक्टरला अटक करण्यात 
आली आहे. 

आशीक असे डाॅक्टरचे नाव आहे. जननी नावाच्या प्रेयसीने हाेस्टेलमध्ये राहणाऱ्या मैत्रिणींचे कपडे बदलणे व स्नान करतानाचे फाेटाे आणि व्हिडिओ रेकाॅर्ड केले. ते तिने आशीकला व्हाॅट्स-ॲपवरून पाठविले. फाेटाे घेत असताना एका मैत्रिणीने तिला पकडले. वाॅर्डनला याबाबत सांगितल्यानंतर पाेलिसांकडे तक्रार करण्यात आली. 

दाेघांच्या माेबाइलची फाॅरेन्सिक तपासणी
जननीने सर्व चॅट डिलिट केले हाेते. त्यामुळे हा प्रकार कधीपासून सुरू हाेता, याची माहिती पाेलिसांना मिळाली नाही. त्यामुळे दाेघांचेही फाेन फाॅरेन्सिक तपासणीसाठी पाठविले आहेत. 

मार्चपासून जननी हाेती हाॅस्टेलमध्ये
जननी ही या हाेस्टेलमध्ये मार्चपासून राहात हाेती. आशीक याचे एक क्लिनिक आहे. तिथे ती काम करत होती. सर्वप्रथम तिने स्वत:चे विवस्त्र व्हिडिओ त्याला पाठविले. नंतर साेबत राहणाऱ्या मुलींचे फाेटाे, व्हिडिओ तिने पाठवायला सुरुवात केली. 

Web Title: Those photos of girlfriend sent to boyfriend repeat case in Chandigarh crime news 2 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.