गोहत्या करणा-यांना भोगावी लागणार जन्मठेप
By admin | Published: March 31, 2017 01:35 PM2017-03-31T13:35:29+5:302017-03-31T13:38:35+5:30
गुजरातमध्ये गोहत्या प्रकरणात दोषी आढळणा-यांना आता आजीवन कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 31 - गुजरातमध्ये गोहत्या प्रकरणात दोषी आढळणा-यांना आता आजीवन कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. शुक्रवारी (31 मार्च) गुजरात सरकारने गो-संरक्षण कायद्यात केलेल्या दुरुस्तीनुसार दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
गुजरातमध्ये पूर्वीही गो-संरक्षण कायदा लागू होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री पद सांभाळत असताना त्यांनी सुधारित कायदा अंमलात आणला. याच कायद्यात आता दुरुस्ती करण्यात आली असून गोहत्या प्रकरणातील शिक्षा आणखी कठोर करण्यात आली आहे.
गोहत्या, गोमांसाची विक्री या सर्व प्रकारांवर गुजरात सरकारने पूर्णतः बंदी आणली होती. याआधी पशु संरक्षण अधिनियम
कायद्यांर्तगत दोषींवर 50, 000 रुपयांचा दंड आणि सात वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद होती.
मात्र आता सुधारित काद्यानुसार गोहत्या प्रकरणात दोषी आढळल्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यता येईल.
आणखी बातम्या