ज्यांनी मला राज्यपाल बनवलं, माझ्या बोलण्यानं त्यांना समस्या असेल तर राजीनामा देईन : सत्यपाल मलिक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 10:14 PM2021-11-07T22:14:02+5:302021-11-07T22:15:22+5:30
Meghalaya Governor Satya Pal Malik on Farmers Protest: जर आपल्या बोलण्यानं कोणाला काही समस्या असतील तर आपण राजीनामा देऊ असं वक्तव्य मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलं.
Meghalaya Governor Satya Pal Malik on Farmers Protest: मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं. ते जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. "शेतकरी आंदोलनात ज्यांता मृत्यू झाला त्यांच्याबद्दत ते (नेते) काही बोलले नाहीत. मी यापूर्वीही सांगितलंय की शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळीही येऊन बसेन," असं सत्यपाल मलिक म्हणाले.
"शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत, जर त्यावर मी काही वक्तव्य केलं तर त्यावर वाद होतील. राज्यपालांना हटवलं जाऊ शकत नाही, परंतु माझे काही शुभचिंतक आहेत, जे याच शोधात असतात की मी काही बोलेन आणि हटवलं जाईल," असंही मलिक यांनी नमूद केलं. "मला दोन तीन जणांनी राज्यपाल बनवलं आहे. शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलल्यास त्यांना समस्या निर्माण होतील, मला याचा अंदाज आहे. परंतु जर त्यांनी काही समस्या आहेत असं सांगितलं तर पद सोडण्यासाठी मी एक मिनिटही वाया घालवणार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
#WATCH | 600 people have died in this farm movement... Even when an animal dies, Delhi 'netas' express condolences, but they could not pass the proposal of 600 farmers in Lok Sabha..: Meghalaya Governor Satya Pal Malik, in Jaipur pic.twitter.com/Mz8RiaCScC
— ANI (@ANI) November 7, 2021
"इतकं मोठं आंदोलन देशात आतवर कधीही चाललं नाही. यामध्ये ६०० शेतकरी शहीद झाले. इथे कुत्रंही मेलं तरी दिल्ल्याच्या नेत्यांचा शोक संदेश जातो. परंतु ६०० शेतकऱ्यांचा प्रस्ताव लोकसभेत पारित जाला नाही," असंही ते म्हणाले.
यापूर्वीही शेतकऱ्यांचं केलं समर्थन
यापूर्वीही सत्यपाल मलिक यांनी शेतकऱ्यांचं खुलेपणानं समर्थन केलं होतं. त्यांनी इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांच्याशी साधलेल्या संवादादरम्यान ३ कृषी कायद्यांविरोधात खुलेपणे शेतकऱ्यांचं समर्थन केलं होतं. आदोलनाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधला असून त्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केल्याचंही ते यावेळी म्हणाले होते.