"ज्यांना भारतात असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बनं उडवून दिलं पाहिजे"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 10:40 AM2019-01-04T10:40:10+5:302019-01-04T10:44:11+5:30

उत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगरमधल्या एका भाजपा आमदारानं वादग्रस्त विधान केलं आहे.

Those who say they feel unsafe and threatened in India should be bombed, BJP MLA Vikram Saini said | "ज्यांना भारतात असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बनं उडवून दिलं पाहिजे"

"ज्यांना भारतात असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बनं उडवून दिलं पाहिजे"

Next
ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगरमधल्या एका भाजपा आमदारानं वादग्रस्त विधान केलंभारतात ज्या लोकांना असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बनं उडवून दिलं पाहिजेभाजपाचे मुजफ्फरनगरमधले आमदार विक्रम सैनी यांनी उधळली मुक्ताफळे

लखनऊः उत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगरमधल्या एका भाजपा आमदारानं वादग्रस्त विधान केलं आहे. भारतात ज्या लोकांना असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बनं उडवून दिलं पाहिजे, अशी मुक्ताफळे भाजपाचे मुजफ्फरनगरमधले आमदार विक्रम सैनी यांनी उधळली आहेत. परंतु हे माझं वैयक्तिक मत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सैनी म्हणाले, मला व्यक्तिगतरीत्या वाटतं की, जे लोक सांगतात भारतात भीती वाटते किंवा ज्यांना भारतात असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बनं उडवून दिलं पाहिजे.

माझ्याकडे एखादं मंत्रालय दिल्यास अशा सर्वच माणसांना मी बॉम्बनं उडवून देईन. कोणालाही सोडणार नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेते नसिरुद्दीन शाह म्हणाले होते की, देशातील मुलांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. बुलंदशहरमध्ये कथित गोहत्येच्या प्रकरणात हिसेंमध्ये पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणावरून मोठं वादंग निर्माण झालं होतं.  मी पण देशभक्त आहे. पण मला गोंधळ घालण्याची गरज वाटत नाही, असं शहांनी म्हटलं होतं.



नसिरुद्दीन शहा यांच्या विधानानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यामुळे त्यांना अजमेर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेता आला नव्हता. त्यावेळी नसिरुद्दीन म्हणाले होते, मे देशद्रोही नाही. देशावर टीका करताना मला दु:ख होतं. मात्र चुकीचं वाटल्यास त्यावर मी अवश्य बोलणार. मला देशाच्या भविष्याची चिंता वाटते. माझ्या 4 पिढ्या या देशात जन्मल्या. माझा जन्मदेखील याच देशात झाला. माझी मुलंदेखील इथंच राहणार आहेत. माझं देशावर खूप प्रेम आहे. मात्र त्यासाठी मला गोंधळ घालण्याची आवश्यकता वाटत नाही,' असं नसिरुद्दीन यांनी म्हटलं होतं

Web Title: Those who say they feel unsafe and threatened in India should be bombed, BJP MLA Vikram Saini said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा