"चीनी वस्तूंचा वापर करणाऱ्यांचे पाय तोडा, घरांचं नुकसान करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 10:55 AM2020-06-22T10:55:45+5:302020-06-22T11:00:37+5:30

अनेकांनी आपल्या फोनमधून चीनी अ‍ॅप्स देखील हटवून याची सुरुवात केली आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे.

Those Who Use Chinese Products Should be Beaten up Bengal BJP Leader | "चीनी वस्तूंचा वापर करणाऱ्यांचे पाय तोडा, घरांचं नुकसान करा"

"चीनी वस्तूंचा वापर करणाऱ्यांचे पाय तोडा, घरांचं नुकसान करा"

Next

भारत आणि चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारताने या कारवाईला जशास तसे उत्तर देत चीनचे 43 सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. मात्र चीनने अद्याप मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही. भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. तर दुसरीकडे देशभरात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेकांनी तर आपल्या फोनमधून चीनी अ‍ॅप्स देखील हटवून याची सुरुवात केली आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे. 

पश्चिम बंगालमधील भाजपाचे नेते जॉय बॅनर्जी यांनी लोकांना चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. मात्र हे आवाहन करताना त्यांनी एक विधान केलं आहे. ज्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. चीनी वस्तू वापरणाऱ्यांना मारहाण करुन त्यांच्या घरांचं नुकसान केलं पाहिजे असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. "चीनला आपण धडा शिकवला पाहिजे. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकून याची सुरुवात करायला हवी. जे लोक अजूनही चीनी वस्तू वापरत आहेत त्यांनी अशा वस्तूंचा वापर बंद केला पाहिजे. त्यांनी असं केलं नाही तर त्यांचे पाय तोडले पाहिजे आणि त्यांच्या घरांचं नुकसान केलं पाहिजे" असं जॉय बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारतीयांनी जर ठरवलं तर चीनला 17 अब्ज डॉलरचा झटका बसू शकतो. चीनमधून भारतात होणाऱ्या एकूण आयातीमधील रिटेल ट्रेडर्स जवळपास 17 अब्ज डॉलर इतके आहे. यामध्ये खेळणी, घरातील वस्तू, मोबाईल, इलेक्ट्रिक सामान आणि कॉस्मॅटिक उत्पादनांचा समावेश आहे. चीनमधून येणाऱ्या या वस्तू बंद झाल्या तर संबंधित वस्तूंची भारतात निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना फायदा होणार आहे. अनेक उद्योजकांनी देखील ई-कॉमर्स कंपन्यांनी चीनमध्ये तयार झालेल्या वस्तूंची विक्री करण्याची बंदी घालावी अशी मागणी केली आहे. 

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया संघटनेचे महासचिव व्ही के बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आमच्या सदस्य असलेल्या व्यापाऱ्यांना त्यांच्याकडील चीनी वस्तूंचा स्टॉक संपवण्यास तसेच त्याच बरोबर यापुढे चीनी वस्तू मागवू नका असं सांगितलं आहे. आम्ही सरकारला देखील ई - कॉमर्स कंपन्यांना चीनी वस्तू विकण्यापासून रोखण्यात यावे ही विनंती केली आहे. कनफेडरेशन ऑफ वेस्ट बंगाल ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुशील पोद्दार यांनी देखील संघटनेने चीनी वस्तूंचा व्यापार बंद करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! तब्बल 81 देशांमध्ये दुसरी लाट; WHO ने दिला गंभीर इशारा

मोदी सरकारच्या 'या' योजनेअंतर्गत 1000 रुपये भाड्याने मिळणार घर; जाणून घ्या कोणाला, कसा होणार फायदा

गुगलने प्ले स्टोरवरुन हटवले 'हे' 30 अ‍ॅप्स; स्मार्टफोनमध्ये असल्यास त्वरीत करा डिलीट अन्यथा...

India China Faceoff : "राहुल गांधींनी यामध्ये राजकारण करू नये", जखमी जवानाचे वडील म्हणतात...

इच्छाशक्तीची गरज! भारत चीनला देऊ शकतो तब्बल 17 अब्ज डॉलरचा जबरदस्त झटका

CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या लढ्यात 'हे' औषध प्रभावी ठरणार; संक्रमण रोखण्यास मदत करणार

Web Title: Those Who Use Chinese Products Should be Beaten up Bengal BJP Leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.