ट्रेन्सची संख्या वाढती, तरीही रेल्वेत सव्वालाख पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 01:33 AM2017-08-07T01:33:56+5:302017-08-07T01:35:19+5:30

भारतात प्रतिवर्षी नव्या ट्रेन्सची संख्या वाढते आहे तरीही एप्रिल २0१६ च्या स्थितीनुसार लोको पायलट, साहाय्यक लोको पायलट, गार्ड, गँगमन, पॉइंट मन, स्टेशन मास्तर अशा प्रवर्गातील एकूण १ लाख २२ हजार ७८३ पदे रिक्त आहेत.

 Though the number of trains increases, the vacant posts of Railways are empty | ट्रेन्सची संख्या वाढती, तरीही रेल्वेत सव्वालाख पदे रिक्त

ट्रेन्सची संख्या वाढती, तरीही रेल्वेत सव्वालाख पदे रिक्त

Next

 सुरेश भटेवरा/  लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतात प्रतिवर्षी नव्या ट्रेन्सची संख्या वाढते आहे तरीही एप्रिल २0१६ च्या स्थितीनुसार लोको पायलट, साहाय्यक लोको पायलट, गार्ड, गँगमन, पॉइंट मन, स्टेशन मास्तर अशा प्रवर्गातील एकूण १ लाख २२ हजार ७८३ पदे रिक्त आहेत. संसदीय स्थायी समितीचा जो अहवाल संसदेत सादर झाला, त्यात या गंभीर बाबींकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
अपघातांना निमंत्रण देणारीच स्थिती
रेल्वेत जवळपास सव्वा लाख पदे रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचाºयांना सलग २0 तास काम करावे लागते. कामाचा वाढलेला भार, थकवा, तणाव इत्यादींमुळे रेल्वे वाहतुकीत उच्चस्तराची दक्षता ठेवणे अनेकदा अशक्य होते. रेल्वे अपघातांना निमंत्रण देणारीच
ही स्थिती असल्याने प्रवाशांची सुरक्षा संकटात आहे.

पुरेसे गँगमन नाहीत
रूळांमुळे काही बिघाड झाल्यास त्वरित दुरुस्तीत गँगमनची भूमिका महत्त्वाची असते. सध्या रेल्वेकडे पुरेसे गँगमन नाहीत, ही बाब या अहवालाव्दारे प्रकाशात आली आहे.

ट्रेन प्रवासाचे सुरक्षित व सतर्क संचालन एक अवघड जबाबदारी आहे. लोको पायलट ती सांभाळतात. प्रत्येक किलोमीटरवर सिग्नल यंत्रणेवर त्यांना लक्ष ठेवावे लागते. १00 कि.मी.अंतराच्या प्रवासात १00 वेळा बाहेर डोकवावे लागते. पुरेसे लोको पायलट नसल्याने बºयाच लोको पायलटना सलग ४ ते ५ दिवस काम करावे लागते. त्यांच्याकडून जराशी देखी चूक झाली तर अनेक प्रवाशांचे आयुष्य संकटात सापडू शकते.

Web Title:  Though the number of trains increases, the vacant posts of Railways are empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.